Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Pump : ‘सौर ऊर्जा’ संचाच्या प्लेटांवर चोरट्यांचा डोळा

Solar Plate Theft : विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या एकाही प्लेटचा शोध अद्याप न लागल्याची स्थिती आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : विद्युत पंपाला विनाखर्चाची दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाकडून अनुदानावर शेतकऱ्यांना पंतप्रधान सौरपंप कुसुम योजनेतून सौरऊर्जा संच मिळाले खरे, पण आता त्यातील प्लेटा सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. या प्लेटा चोरीला जात असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या एकाही प्लेटचा शोध अद्याप न लागल्याची स्थिती आहे.

राज्यात वीजेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. विजेची मागणी वाढल्यावर भारनियमन आणि दिवसाऐवजी रात्रीची वीज असते. भारनियमनामुळे व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडून पंतप्रधान सौरपंप कुसुम योजनेतून विद्युतपंपासह सौरसंच बसवला जातो. त्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. याचा लाभ घेत राज्यात हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत सौरसंच शेतात बसविले आहेत.

दरम्यान, हे संच चोरांपासून सांभाळण्याचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांच्या प्लेटा चोरीला गेल्या आहेत. एका संचाची किंमत किमान अडीच लाखापासून दहा ते पंधरा लाखापर्यंत आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी भागात चोरीचे प्रकार अधिक घडत आहेत. हातगाव (ता. शेवगाव) येथे आठवड्यापूर्वी किसन जऱ्हाड या शेतकऱ्याने कूपनलिकेवर सौर ऊर्जा कृषी पंप बसविला आहे.

परंतु चोरट्यांनी सौर प्रकल्पाच्या प्लेटाच लंपास केल्या आहेत. सौरऊर्जा संच मिळालेल्या शेतकऱ्याला ‘महावितरण’कडून वीज जोडणी मिळत नाही. त्यामुळे ऐनवेळी प्लेटा चोरीला गेल्यास पिकाला पाणी देण्याचा प्रश्नही तयार होत आहे. पोलिसांत तक्रार दाखल करूनही आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या प्लेटांचा तपास लागलेला नाही.

चोरीला गेलेल्या प्लेटा नेमक्या जातात कोठे, त्याची विल्हेवाट कोठे लावली जाते हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तपास लागत नसल्याने चोरलेल्या प्लेटांची विल्हेवाट लावण्यासाठी एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पंतप्रधान सौरपंप कुसुम योजनेतून सौरसंच बसवला. त्यामुळे वीजेचा प्रश्न सुटला. मात्र संचाच्या प्लेटा चोरीला गेल्या. पोलिसांत फिर्याद दिली. अजून तपास लागलेला नाही. पिकांना पाणी देणे थांबले आहे. संचाला जीपीएस बसवणे गरजेचे आहे.
- सुधीर बांगर, शेतकरी, दुले चांदगाव, ता. पाथर्डी, जि. नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT