Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest : भूकरमापकासह एक खासगी व्यक्ती लाच घेताना ताब्यात

Bribe News : मोजणीच्या प्रकरणात भूकरमापकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास ताब्यात घेतले होते.

Team Agrowon

Pune News : मोजणीच्या प्रकरणात भूकरमापकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला भूकरमापक हा हवेली मोजणी कार्यालयात कार्यरत आहे.

त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली असता खासगी व्यक्ती योगेश्‍वर मारणे याने दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांची जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी ५० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. मारणे आणि गायकवाड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

दौलत मधुकर गायकवाड असे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे, तर योगेश्‍वर राजेंद्र मारणे असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. या दोघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची देहूगाव येथे जमीन आहे. त्या जमिनीच्या मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी आरोपी लोकसेवक दौलत गायकवाड यांनी एका खासगी व्यक्तीमार्फत तक्रारदार यांच्याकडे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT