Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : केंद्रस्तरावर दूधदर निश्चितसाठी किंमत आयोग नेमा

Milk Price Commission : केंद्र सरकार स्तरावर दूधदर निश्चित करण्यासाठी किंमत आयोग नेमला पाहिजे. किमान हमीभाव अनिवार्यता कायदा बनवल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल निश्चितच मिळेल.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकार स्तरावर दूधदर निश्चित करण्यासाठी किंमत आयोग नेमला पाहिजे. किमान हमीभाव अनिवार्यता कायदा बनवल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल निश्चितच मिळेल. उत्पादन खर्च व त्यावर काही प्रमाणात नफा याची सांगड घालून आधारभूत किंमत निश्चित केल्यास शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागण्याची वेळ येणार नाही.

देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास दूध उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळेल, याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले.सिन्नर तालुक्यातील वावी येथे मंगळवारी (ता. २) दूध परिषद व शेतकरी मेळावा राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवी मोरे, सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. रवींद्र पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पगार, कृष्णा घुमरे, मच्छिंद्र चिने, गणेश वेलजाळी, संदीप शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेत सरकारने मर्जीतल्या लोकांची बैठकी घेऊन दुधाला ३० रुपये दर देण्याची घोषणा केली. मात्र हे लबाडाघरचे आमंत्रण आहे. यापूर्वी घोषणा केलेले पाच रुपये लिटरचे अनुदान २० टक्के शेतकऱ्यांनादेखील मिळालेले नाही. जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडचणी उभ्या केल्या. आम्हाला तोंडाची वाफ घालवायची नाही. गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास सरकारच्या विरोधात सोमवारनंतर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शेतीमालाचे बाजारभाव वाढल्यास सरकार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे नुकसान करते. राज्यातील कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

दुधाची भेसळ रोखण्यात अन्न, औषध प्रशासन अपयशी

दुधाची भेसळ रोखण्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन अपयशी ठरले आहे. सरकारने पुढाकार घेऊन भेसळखोरांवर कठोर कारवाई करावी व बनावट दुधाची वाट लावा. असे केल्यास निर्भेळ दूध बाजारात उपलब्ध होईल. खात्रीशीर दूध मिळणार असेल तर ग्राहकांना देखील दूध खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजायला आवडेल याकडे लक्ष वेधले. दुधात भेसळ करून शेतकरी कोणाच्या जिवाशी खेळणार नाही. भेसळखोरांवर कारवाई केल्यावर जप्त केलेला माल कुठे जातो हे कोडे आहे. दूध भेसळ रोखल्यास परवडणारा दर शेतकऱ्यांना खात्रीशीरपणे मिळेल, असे शेट्टी यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT