Grass Cutter Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : बहुपयोगी शेती संयंत्राला मिळाले पेटंट

Grass Cutter : संयंत्र पेट्रोलसोबतच रिचार्जेबल बॅटरीवरही चालते

Vinod Ingole

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Yavatmal News : यवतमाळ ः ग्रासकटर म्हणजे गवत कापणीपुरतेच मर्यादित सयंत्र हा समज खोटा ठरवीत सवना (ता. महागाव, यवतमाळ) येथील प्राध्यापकाने संशोधन करीत पाच उपयोगिता असलेले खास संयंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे संयंत्र पेट्रोलसोबतच रिचार्जेबल बॅटरीवरही चालते. त्यामुळेच या मल्टिफंक्‍शनल टूलला भारत सरकारचे पेटंटही मिळाले आहे.

शेतीमध्ये ग्रासकटरचा उपयोग बहुतांश शेतकरी करतात. याच्या माध्यमातून फळपिकातील, तसेच इतरही पिकांतील तण काढण्यावर भर दिला जातो. सध्या बाजारात केवळ पेट्रोलचलित ग्रासकटर उपलब्ध आहेत. विठ्ठल-रुख्मिणी महाविद्यालय सवना येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पंकज चौधरी यांनी अमरावती विद्यापीठाचे डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात बहुपयोगी ग्रास कटर विकसित केले आहे.

बाजारात गवत कापणे, स्टरर, ड्रीलिंग, क्‍लीनिंग अशा कामांसाठी चार वेगवेगळी संयंत्र उपलब्ध आहेत. परंतु डॉ. पंकज चौधरी यांनी विकसित केलेल्या एकाच संयंत्राच्या माध्यमातून पाच प्रकारची कामे करता येणे शक्‍य आहेत. ग्रास कटरचे ब्लेड काढण्यासाठी या संयंत्राला वरील बाजूस एक नटबोल्ट देण्यात आला आहे. तो जास्त आवळल्यास ब्लेड सहज काढता येत दुसऱ्या कामासाठी लागणारी यंत्रणा बसविता येणार आहे. ब्लेड काढून वायफर बसविल्यास याद्वारे ग्लास स्वच्छ करता येतील. १०० ते ५०० लिटर किंवा त्यापेक्षा अधिक रसायन किंवा रंग ढवळण्यासाठी स्टररचा उपयोग होतो. स्टरर बसविल्यास हे काम देखील याद्वारे करता येणार आहे. घरातील फरशी किंवा टाइल्स स्वच्छतेसाठी स्पीन मॉप म्हणून हे वापरता येईल. विविध पिकांत शेंडा खुडणी म्हणूनही याचा उपयोग होणार आहे. प्लॅस्टिक तसेच लोखंडी पाइपला ड्रील करण्याकामी देखील याचा वापर करता येईल, अशी माहिती डॉ. पंकज चौधरी यांनी दिली. या संशोधनाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, उपाध्यक्ष सुभाष सवनेकर, महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख, संचालक साहेबराव चौधरी, प्राचार्य हेमंत महल्ले यांनी कौतुक केले आहे.

मल्टिफंक्‍शन संयंत्र विकसित करण्यात आले असून याद्वारे वेळ आणि श्रमात बचत होणार आहे. ग्रासकटर सध्या पेट्रोलचलित आहे. परंतु विकसित संयंत्रात रिचार्जेबल बॅटरीचा देखील पर्याय आहे. या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट देखील मिळाले आहे.
- डॉ. पंकज चौधरी
मो. ९८८१२१९०१६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT