Agro Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Tourism: कृषी-पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा अध्याय

Rural Development: कुमारगंज, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी विद्यापीठ संघ यांच्यातर्फे आयोजित भारतीय कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे ४८ वे अधिवेशन गुरुवारी (ता. १३) आणि शुक्रवारी (ता. १४) कुमारगंज, अयोध्या येथे पार पडले.

Team Agrowon

Parbhani News: कुमारगंज, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी विद्यापीठ संघ यांच्यातर्फे आयोजित भारतीय कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे ४८ वे अधिवेशन गुरुवारी (ता. १३) आणि शुक्रवारी (ता. १४) कुमारगंज, अयोध्या येथे पार पडले.

या अधिवेशनाची प्रमुख संकल्पना भारतामध्ये ‘कृषी-पर्यटन : शिक्षण व ग्रामीण विकास यांच्यातील दुवा’ ही होती. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळू शकेल, असा सूर या अधिवेशनात उमटला असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी सांगितले.

या अधिवेशनात डॉ. इंद्र मणी यांचे प्रमुख व्याख्यान झाले आणि तज्ज्ञ पॅनेल चर्चेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम कृषी-पर्यटन संकल्पना स्वीकारली असून राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात एक कृषी-पर्यटन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणी येथे जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान कृषी-पर्यटनविषयक परिसंवाद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात उत्कृष्ट पीएच. डी. प्रबंध आणि सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले.

या अधिवेशनात देशभरातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांची उपस्थिती होती. कृषी-पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक विविध उपायांवर चर्चा करण्यात आली. डॉ. इंद्र मणी यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे या क्षेत्रातील संशोधन आणि धोरणे अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने मौलिक विचारमंथन घडले.

आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या अधिवेशनामुळे कृषी-पर्यटनासंबंधी नव्या संधी उघडण्यास मदत होईल आणि ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात सकारात्मक योगदान देईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT