निविष्ठा खरेदी असो की शेतीमाल विक्री, हे जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केले, तर त्यांना त्याचा लाभच होणार आहे, शिवाय दोन्हींच्या वाहतूक खर्चात मोठी बचत देखील होऊ शकते..उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाला आणि मार्डी येथील शेतकऱ्यांनी १४ मिनी ट्रॅक्टर आणि त्यासाठीच्या फणकुळवांची एकत्रित खरेदी करून ‘बार्गेनिंग पॉवर’च्या बळावर सवलत मिळवत सुमारे सात लाख रुपयांची थेट बचत गेली आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लॉटरीमध्ये निवड झाल्यावर प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या तयारीत होते. परंतु दोन्ही गावांतील शेतकरी गटांनी शक्कल लढवत एकत्र खरेदी केली आणि प्रति शेतकरी सुमारे ५० हजार रुपये वाचविले आहेत..Collective Tractor Purchase: एकाचवेळी १४ ट्रॅक्टर खरेदीतून शेतकऱ्यांनी वाचविले २१ लाख.या सर्व शेतकऱ्यांना सरकारी अनुदानामुळे जवळपास २१ लाख रुपयांचा देखील लाभ झाला आहे. अर्थात, अनुदानाचा लाभ योजनेतील सर्वच शेतकऱ्यांना मिळतोय. परंतु एकीच्या बळावर त्यांनी वाचविलेल्या सात लाख रुपयांची चर्चा मात्र गाव परिसरात चांगलीच रंगतेय. खरे तर कुटुंब असो की शेतकरी समाज एकत्र राहिल्याने त्यांचे सामर्थ्य वाढते आणि अनेक संकटेही सहज दूर करता येतात. परंतु अलीकडे या दोन्ही ठिकाणी कमालीचा विभक्तपणा दिसून येतो. त्याचे प्रतिकूल परिणाम देखील कुटुंबासह, शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत..मुळात शेतीत काम करायला मजूर तयार नाहीत. मजूरटंचाईला कंटाळून काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले आहे. पीक पेरणी तसेच काढणीच्या हंगामात मजूरटंचाईच्या झळा अधिकच बसतात. अशा वेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत टप्प्याटप्प्याने एकमेकांच्या शेतात कामे केली तर मजूरटंचाईवर थोड्या प्रमाणात का होईना, मात करता येते. पूर्वी याच संकल्पनेवर इर्जिकच्या माध्यमातून कामे केली जात होती. परंतु अलीकडे ही संकल्पना जवळपास लोप पावली आहे. शेतीसाठीच्या निविष्ठा असो की यंत्रे-अवजारे यांची खरेदी शेतकऱ्यांनी एकत्रित केली तर त्यांची सौदा शक्ती वाढते..Tendu Collection: हंगामात २०० कोटी रुपयांचे तेंदूपाने संकलन .मोठ्या ऑर्डरची दखल कंपन्या, विक्रेत्या यांना देखील घ्यावीच लागते. त्यातून मिळणाऱ्या सवलतीचा फायदा सर्वांना होतो. शेतकऱ्यांची सर्वांत जास्त पिळवणूक बाजारात होते. व्यापारी एकत्र येऊन कार्टेल करत शेतीमालाचे भाव नेहमी पाडत असतात. शेतकऱ्यांनी देखील एकजूट दाखविली, ठरावीक भावाच्या खाली शेतीमाल विकायचाच नाही, असा निर्णय घेतला तर व्यापाऱ्यांचे कार्टेल मोडीत काढत थोडा अधिक दर पदरात पाडून घेता येतो. महत्त्वाचे म्हणजे निविष्ठा खरेदी असो की शेतीमाल विक्री हे जर गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केले, तर दोन्हींच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होऊ शकते..शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीची ताकद फार मोठी असते, हे यापूर्वीच्या अनेक आंदोलनांतून दिसून देखील आले आहे. शेतकरी एकत्र आले तर हव्या त्या मागण्या ते मान्य करून घेऊ शकतात. याची जाणीव राज्यकर्त्यांना असल्यामुळे ते शेतकऱ्यांना एकत्र तर येऊ देत नाहीत, उलट त्यांच्यात फूट पाडण्याचे काम करतात. राज्यात, देशात शेतकरी संघटनांच्या उडालेल्या चिरफळ्या हे त्याचेच द्योतक आहे..शेतकरी देखील या षड्यंत्राला बळी पडत असतात. परंतु यात सर्वाधिक नुकसान हे त्यांचेच आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आता एकत्रित यायला हवे. गट शेती, उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येत आहेत, ही चांगली बाब आहे. या चळवळीची व्याप्ती वाढवावी लागेल. शिवाय शेतकरी गट, उत्पादक कंपनी नसली तरी शेतीच्या विविध कामांपासून ते शेतीमाल विक्रीपर्यंत शेतकरी एकत्र येऊन आपला फायदा करून घेऊ शकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.