PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : ‘झिरो बॅलन्स’ने उघडा नवीन खाते

PDCC Bank : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे कामकाज चालत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४’ च्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने (पीडीसीसी) नवीन खाते केवळ शंभर रुपये भरून उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे कामकाज चालत आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठीची नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महिलांना जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करूनही लाभ घेता येईल. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल.

जिल्हा बँकेच्या २९४ शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शंभर रुपयांत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना १५०० रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

- योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज.

- लाभार्थ्यांचे आधार कार्ड.

- मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) तथापि पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना.

- उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट आहे.

- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

- पासपोर्ट आकाराचा फोटो

- रेशनकार्ड

- योजनेच्या अटींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

- योजनेत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.

- योजनेअंतर्गत पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक (अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक इत्यादी ठिकाणी)

- २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला पात्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT