Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule News : आदिवासी आश्रमशाळांच्या अनुदानप्रश्‍नी मोर्चा काढणार

Tribal Ashram School : या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांनी कोरोना काळापासून आजतागायत शासनाकडून पोषण आहाराचे अनुदान आमच्या संस्थेसह राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळांना पुरेशा प्रमाणात मिळाले नसल्याचे सांगितले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ‘राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांतील निवासी विद्यार्थ्यांचे कोरोना काळापासून रखडलेले अनुदान शासनाने त्वरित न दिल्यास, आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला.

शनिवारी (ता. ७) इंदापूर येथील भीमाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, किसन जावळे, कालिदास देवकर, बाबजी भोंग, माऊली नाचण, दत्तात्रेय तोरसकर, संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे, अस्मिता मखरे उपस्थित होत्या.

या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांनी कोरोना काळापासून आजतागायत शासनाकडून पोषण आहाराचे अनुदान आमच्या संस्थेसह राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळांना पुरेशा प्रमाणात मिळाले नसल्याचे सांगितले.

त्यामुळे संस्थाचालकांना येणाऱ्या अडचणी सुळे यांच्यासमोर मांडल्या. त्या वेळी सुळे यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महिला आरक्षण, संसदेतील कामकाज या विषयी सुळे यांच्याकडून माहिती घेतली. तर खासदारच का व्हावसं वाटलं? या प्रश्‍नाचे त्यांनी दिलखुलास उत्तर दिले. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT