Khandesh News : कुऱ्हा काकोडा तालुक्यातील भोटा (ता.मुक्ताईनगर) शेती शिवारात ३५ ते ४० फूट खोल पाण्याच्या विहिरीत अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा पडला. शेतकऱ्यांनी माहिती दिल्यावर वन विभागाच्या पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले.
उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, जणू चैत्रातच वैशाख वणवा पेटला आहे. भोटा शेती शिवारातील भोटा ते कोऱ्हाळा रस्त्यावरील गट नंबर १६८/२/२ मधील सचिन शर्मा यांच्या शेतातील पस्तीस ते चाळीस फुट खोल विहिरीत बिबट्याचा छावा पडला.
गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाला शेतात खत फेकण्याचे काम शेतमजूर करीत होते त्यावेळी विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेलेला कुणाल वसंता महाले याला विहिरीत डरकाळ्याचे आवाज आले. त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याला बिबट्याचे बछडे दिसले. त्याची चांगलीच भंबेरी उडाली त्याने शेत मजुर महिलांना सांगितले
त्यांनंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनाधिकारी परिमल साळुंके, वनपाल डी. जी. पाचपांडे, वनरक्षक सुधाकर कोळी, व वनमजूर यांनी घटनास्थळी गर्दीला बाजूला करुन लोखंडी पिंजरा विहिरीत आत सोडला आणि दोराच्या सहाय्याने बांधलेले पिंजऱ्याचे लोखंडी गेट वर उचलताच बिबट्याच्या पिल्लाने पिंजऱ्यात आत प्रवेश केला आणि गेट बंद झाले पिंजरा विहिरीच्या वरती घेण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.