Farmer As Life Partner  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer As Life Partner : शेतकरीच नवरा हवा गं बाई..!

Agriculture News : शेतीची पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना सध्या विवाह स्थळे मिळणे अडचणीचे झाले आहे. मुलींची नोकरदार व गलेलठ्ठ पगार असलेल्या मुलांना पसंती असतो.

Team Agrowon

मनोहर बोचरे

Nashik News : शेतीची पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना सध्या विवाह स्थळे मिळणे अडचणीचे झाले आहे. मुलींची नोकरदार व गलेलठ्ठ पगार असलेल्या मुलांना पसंती असतो. परिणामी शेतकरी तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात खूप अडचणी येतात.

अनेक मुली ‘शेतकरी नवरा नको गं बाई’, असं म्हणत स्थळांना नकार देतात. हे वास्तव नाकारत मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणीने ‘शेतकरी नवराच हवा’, असा हट्ट धरला. तिच्या पालकांनी मोठ्या शहरातील चांगले स्थळ नाकारून मुलीची इच्छा पूर्ण केली.

मुंबईत महिन्यापूर्वीच ‘म्हाडा’मध्ये निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले अनिल सखाराम बेळे यांना तीन मुली. दोन्ही मुली नोकरीला असलेल्या मुलांना दिल्या. तिसरी कन्या निकिताला लाडात वाढवून इच्छेप्रमाणे शिक्षण दिले.

निकिताने सौंदर्य शास्त्रातील पदवी घेतली. तिला मोठ्या शहरातून अनेक स्थळे आली. चांगली खासगी नोकरी करणारे, व्यावसायिक, पैसा, बंगला असलेली अनेकांची स्थळं आली. पण मला शेतकरी नवराच हवा, असा हट्ट तिने केला लेकीचा हा हट्ट वडिलांनी पूर्ण केला.

मुखेड (ता. येवला) येथील अमोल पगार या शेतकरी युवकाशी निकिताच लग्न नुकतंच पार पडलं. वर अमोल पगार हाही उच्चशिक्षित असला तरी शेतीची आवड असल्याने त्याने शहराचा मार्ग न धरता फळबागेची उत्कृष्ट शेती करून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी नको म्हणणाऱ्या तरूणींच्या डोळ्यात हा विवाह अंजन ठरावा. निकिता व तिच्या वडिलांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला.

जन्म, बालपण, शिक्षण असा २४ वर्षांचा काळ मुंबईत गेला. मला व्यावसायिक, नोकरीवाले, पैसा, बंगला असलेली स्थळ आली. परंतु मला खेड्यातील शेतकरी मुलगा हवा होता. आज मुंबईचे वातावरण दूषित झाले आहे. मात्र गावाकडे शुद्ध हवा, सेंद्रिय भाजीपाला मिळतो. मला शेतीतील काही कळत नाही. मात्र मला शेतीची आवड असल्याने मी आनंदाने शेती करायला तयार आहे.
- निकिता पगार, नववधू
ग्रामीण भागातील शेतकरी मुलगा नको, ही सर्रास मानसिकता आहे. त्यामुळे शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कुणी तयार नाही. मात्र मुलीची इच्छा व तिच्या वडिलांचा मोठेपणा यामुळे तिचा अमोलशी विवाह झाला. शेतकरी बांधवांना विनंती आहे, की त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी.
- साहेबराव पगार, वरपिता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT