Water and Land Management Institute Agrowon
ॲग्रो विशेष

WALMI Development Plan : ‘वाल्मी’च्या गतवैभवासाठी ५४६ कोटीचा आराखडा तयार

Water and Land Management Institute : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेला (वाल्मी) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुविधा विकास, पदभरती, विस्तार कामांसाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जल व भूमी व्यवस्थापन संस्थेला (वाल्मी) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुविधा विकास, पदभरती, विस्तार कामांसाठी ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी व पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावू, असे प्रतिपादन मृद्‍ व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वाल्मी येथील आढावा बैठकीत केले.

वाल्मी येथे संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २६) बैठक आयोजित करण्यात आली. संस्थेचे महासंचालक वि. बा. नाथ, जलसंधारण विभागाचे अव्वर सचिव नितीन दुसाने, डॉ. राजेश पुराणिक, डॉ. गारुडकर, डॉ. दुरबुडे, डॉ. बोडखे,उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी वाल्मी संस्थेच्या सद्यःस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. वाल्मीने केलेल्या कामगिरीबाबत तसेच वाल्मीच्या आगामी काळात राबवावयाच्या उपाययोजना, सुविधा विस्तार विकास याबाबत माहिती सादर करण्यात आली. संस्थेतील पदांच्या अनुशेषाबाबत व नव्याने करावयाच्या पदभरतीबाबत माहिती देण्यात आली.

श्री राठोड म्हणाले, की वाल्मीतील सुविधांच्या विकासासाठी व नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी एकूण ५४६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मृद्‍ व जलसंधारणाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाल्मीची भूमिका महत्त्वाची आहे. दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने जलसंधारण ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबतही नियोजन असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

SCROLL FOR NEXT