Orchard Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Fire In Orchard : महिला शेतकऱ्याच्या फळबागेत लावली आग

घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्याने वर्तविला असून, भरपाईची मागणी केली आहे.

Team Agrowon

Gondiya Fire News : सौंदड मुंडीपार (सडक अर्जुनी) शिवारात अज्ञाताने लावलेल्या आगीत १३० फळझाडांसह सिंचन साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्याने वर्तविला असून, भरपाईची मागणी केली आहे.

मुंडीपार, सिंदीपार गावशिवारात गट क्रमांक २५/२ मध्ये एकूण ०.९० हेक्‍टर क्षेत्र हे भावना भाऊराव यावलकर यांच्या मालकीचे आहे. याच शिवारात त्यांनी लाल चंदन, पांढरा चंदन, आंबा, फणस, लिंबू, रामफळ, संत्री, चिकू, सैत्तू अशा विविध फळझाडांची लागवड केली होती.

याच बागेला अज्ञात व्यक्‍तीने आग लावली. आगीची माहिती मिळताच महिला शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी शेताकडे आग विझविण्यासाठी धाव घेतली.

गावातील नागरिकांनी देखील या कामात सहकार्य केले. मात्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याआधीच सुमारे १३० झाडे खाक झाली होती. यामध्ये लाल चंदन ४७, पांढरा चंदन २७, आंबा २८, फणस ३, लिंबू १, रामफळ १, संत्री १९, चिकू ३ व सैत्तू एक याप्रमाणे झाडांचा समावेश आहे.

त्याचबरोबर १४०० मीटर ड्रीप पाइपलाइनसह इतर साहित्याची राख झाली. यामध्ये जवळपासून पाच लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच महसूल व कृषी विभागाकडून रीतसर पंचनामा करण्यात आला. त्याच वेळी अज्ञात व्यक्‍तीविरोधात पोलिसात तक्रारही देण्यात आली. मात्र पोलिसांकडून तक्रारीची कोणतीच दखल घेण्यात आली नाही, असा आरोप महिला शेतकऱ्याने केला आहे.

पोलिसांनी संबंधिताचा शोध घेत त्याच्यावर रीतसर कारवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT