Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Onion Rate : कांदा अडत व्यापाऱ्याला खोटा धनादेश देऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जी. कंखरे यांनी आरोपीला चार महिन्यांचा कारावास आणि आठ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Team Agrowon

Solapur News : कांदा अडत व्यापाऱ्याला खोटा धनादेश देऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जी. कंखरे यांनी आरोपीला चार महिन्यांचा कारावास आणि आठ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

बिलाल अ. गफूर बागवान असे शिक्षा झालेल्या खरेदीदार कांदा व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की यातील फिर्यादी किशोर दत्तात्रय मडूर (केडीएम) यांनी बिलाल बागवान यांना २०२० आणि २०२१ या वर्षात सुमारे ८ लाखांहून अधिक रुपयांची कांदा विक्री केली होती.

या कांद्याच्या खरेदीपोटी बागवान यांनी मडूर यांना ८ लाख ६ हजार ९४ रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश मडूर यांनी बँकेत जमा केला, परंतु संबंधित बँक खात्यावर बॅलन्स नसल्याने धनादेश परत आला.

त्यानंतर फिर्यादी मडूर यांनी बागवान यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली. ही नोटीस घेऊनही बागवान यांनी ही रक्कम दिली नाही. त्यानंतर मडूर यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.

त्यावर सुनावणी होऊन बागवान याला शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. यात फिर्यादी मडूर यांच्यातर्फे अॅड. इस्माईल शेख, अॅड. सिराज शेख आणि अॅड. वसीम शेख यांनी काम पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

Solapur Market Committee : सोलापूर बाजार समितीत १ हजार १६४ ट्रक कांद्याची आवक

SCROLL FOR NEXT