Onion Rate : आवक घटल्याने कांद्याची भाववाढ, कांद्याची वाहतूक पावसाने थंडावली

Kolhapur Onion Market : घाऊक बाजारपेठेत आठ हजार कांदा पोत्यांची आवक शिल्लक आहे. ही भाववाढ तात्पुरती असल्याचे घाऊक बाजार पेठेतून सांगण्यात येत आहे.
Onion Rate
Onion Rateagrowon
Published on
Updated on

Kolhapur Shahu Market : कोल्हापूर शाहू मार्केट यार्डातील कांदा-बटाटा घाऊक बाजारपेठेत सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्याने कांद्याची भाववाढ झाली आहे. यात कांदा १५० ते ५०० रुपये दहा किलो असा घाऊक भाव आहे. घाऊक बाजारपेठेत आठ हजार कांदा पोत्यांची आवक शिल्लक आहे. ही भाववाढ तात्पुरती असल्याचे घाऊक बाजार पेठेतून सांगण्यात येत आहे.

मागच्या काही दिवसात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरू केले आहे. यामुळे कोल्हापूर बाजारपेठेत पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर येथून येणाऱ्या कांद्याची आवक घटली आहे. नवीन कांदा येण्यास अद्याप एक महिन्याचा वेळ आहे. यात कोल्हापूर बाजारपेठेतून कर्नाटक, कोकण व गोव्याकडे जाणारी कांद्याची वाहतूक पावसामुळे थंडावल्याचे चित्र आहे.

नवीन कांदा बाजारपेठेत येत नाही. जुन्या कांद्याची वाहतूक होत नाही, अशा कोंडीत कांदा बाजार सापडला आहे. त्यामुळे घाऊक दरात भाव वाढले आहेत. असा प्रथम व व्दितीय श्रेणीचा कांदा ४०० ते ५०० रुपये दहा किलो आहे तर तृतीय चौथ्या श्रेणीचा कांदा १५० ते ३०० रुपये दहा किलो असा भाव आहे.

Onion Rate
Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

स्थानिक बाजारपेठेतील किरकोळ विक्रेते चौथ्या व तिसऱ्या श्रेणीचा कांदा खरेदी करून तो कांदा प्रती ४० ते ५० रुपये एक किलोप्रमाणे विकत आहेत. पावसाळ्यात कांद्याची मागणी कमी होते. अनेकदा कांद्याला कोंब फुटतात, तर काहीवेळा कांदा भिजल्याने खराब होतो. असे नुकसान भरून काढण्यासाठी दोन-पाच रुपये जादा दरात किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होते, असे विक्रेता रफिक बागवान यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com