Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Sugarcane FRP : यावर्षी शेतकऱ्यांच्या या संकल्पनेला दृष्ट लागली आणि हातातोंडशी पीक आले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि शेतातील पीक पाण्यात बुडाले, काही ठिकाणी कोंब आले.
Sugar Mill
Sugar MillAgrowon
Published on
Updated on

Sangli News : हातातोंडाशी आलेला खरीप पावसाने मातीमोल झाला. ऊसबिलाचा १०० आणि ५० रुपयांचा फरक द्या, असा सरकारचा आदेश असताना त्याला जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी केराची टोपली दाखवली.

त्यामुळे यावर्षी ची शेतकऱ्यांचे दिवाळीचे स्वप्न अपुरे राहणार आहे. यावर्षी खरीप चांगला पिकला की उधार उसनवार भागवू, दिवाळी चांगली करू, कुणापुढे हात पसरायला नको आशा पद्धतीची साधी स्वप्ने पाहणाऱ्या बळीराजाच्या हिरव्या स्वप्नांवर पावसाचे पाणी पडले आहे.

Sugar Mill
Sugarcane FRP : ...अन्यथा कारखानदारांना उसाचा बुडखा दाखवू; राजू शेट्टी यांचा इशारा

यावर्षी शेतकऱ्यांच्या या संकल्पनेला दृष्ट लागली आणि हातातोंडशी पीक आले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि शेतातील पीक पाण्यात बुडाले, काही ठिकाणी कोंब आले. काहीशी हाताला लागले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी पडले. दिवाळी चांगली साजरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. हे कमी काय पूर्वी साखर कारखानदार दिवाळीसाठी ऊसबिल काढायचे आता एफआरपी या मुद्याप्रमाणे बिल देत आहेत.

Sugar Mill
Karnataka Sugarcane Frp : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांची एफआरपी ३९०० पार

परंतु साखरेला बाजारपेठेत चांगला दर मिळत असताना जादा दर देण्याची भूमिका कोणत्याही कारखान्याची नाही. उलट गतवर्षीच्या गाळप हंगामातील तीन हजारांच्या आत व तीन हजारांच्या पुढे दर देणाऱ्या कारखानदारांनी ५० व १०० रुपयांचा फरक द्यावा, असा आदेश राज्य सरकारने यापूर्वीच काढला आहे. त्या आदेशाला कारखान्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आसी. आशा संकटांमुळे बळीराजाच्या घरात दिवळीच्या तोंडावर मात्र अंधार आहे.

शेतकरी रोजच मरण अनुभवत आहेत. शेतकऱ्यांच्या दुखण्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. राजकीय नेते आणि आणि प्रशासन त्यांना लुटत आहे. तरुण पिढीतील शेतकऱ्यांनी यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. तरच बळीराजाला चांगले दिवस येतील.
- बी. जी. पाटील, संस्थापक, बळीराजा शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com