Chia Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Chia Seed Crop : डोंगरगावच्या शेतकऱ्याने घेतले चिया सीडचे पीक

Chia Seed Cultivation : मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी बालाजी महादवाड यांनी अमेरिकन चिया या औषधी पिकाची यशस्वी लागवड केली आहे.

Team Agrowon

Nanded News : मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी बालाजी महादवाड यांनी अमेरिकन चिया या औषधी पिकाची यशस्वी लागवड केली आहे. एका एकरात साडेसात क्विंटल उत्पादन मिळाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून शेतीपिकात बदल करून नावीन्यपूर्ण शेती करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चिया सीड, मेडिकल मिरची या सारखी पिके घेतली आहेत.

मुदखेड तालुक्यातील डोंगरगावातील बालाजी दत्तराव महादवाड यांनी एक एकरमध्ये चिया सीडची लागवड केली आहे. तुळजापूर येथून पेरणीसाठी लागणारे तीन किलो बियाणे प्रति एकरी या प्रमाणे विकत घेतले.

या पिकाची पेरणी त्यांनी ता. ३१ डिसेंबर रोजी केली. तर काढणी ता. चार रोजी केली. पेरणीनंतर ११० दिवसांत तयार होणारे हे पीक आहे. या पिकास कोणताही वन्यप्राणी खात नाही किंवा याच्यापासून प्राण्यांना धोका नाही. तसेच या पिकास खत किंवा कीटकनाशकाची गरज लागत नाही.

पीक काढणीनंतर विक्रीसाठी मध्य प्रदेशातील नीमुच मंडी, नाशिक व तुळजापूर येथे विक्रीसाठी ठिकाण आहे. बालाजी महादवाड यांना एका एकरामध्ये सात क्विंटल ५७ किलो पीक निघाले आहे. पिकास अंदाजे २५ ते ३० हजार रुपये क्विंटल दर असतो. चियापासून मानवी शरीरास अनेक फायदे होतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election: जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल ७ फेब्रुवारीला

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभू’च्या आवर्तनाने लाभ क्षेत्रात दिलासा

Onion Farming: कांदारोप खरेदी-विक्रीवर मुल्हेर परिसरात भर

Sangli Sugar Production: सांगली जिल्ह्यात साखरेचे ५३ लाख क्विंटल उत्पादन

Rabi Crops: मालेगावात थंडीमुळे गहू, हरभरा पीक जोरात

SCROLL FOR NEXT