Amravati News : बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढून त्याचा एकूणच परिणाम संत्रा उत्पादनावर झाला आहे. यंदा जिल्ह्यात तीन लाख टन संत्रा उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संत्रा उत्पादकांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असून राज्य सरकारने दखल घेत प्रति एकर वीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यात ७९ हजार २१३ हेक्टर क्षेत्र संत्रा बागांखाली आहे. २०२३-२४ मध्ये यातील ६५ हजार ३५० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. वरूड, मोर्शी, अचलपूर व चांदूर बाजार या चार तालुक्यांत संत्रा उत्पादनाखाली सर्वाधिक ५५ हजार ९०६ हेक्टर क्षेत्र असून गत हंगामात अवकाळीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
तर यंदा अतिपावसाने नुकसान होऊ लागले आहे. १५ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत तब्बल ३० ते ३५ दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यंदा पावसामुळे झालेल्या फळधारणेतील तीस ते चाळीस टक्के फळगळती झाली आहे. त्यामुळे या वर्षी गृहीत धरलेल्या ७ लाख ४८ हजार ४२० टन उत्पादनाच्या तुलनेत २ लाख ९९ हजार ३६८ टन संत्रा कमी उत्पादीत होण्याचा अंदाज आहे.
संत्रा उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रति एकर वीस हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने सरकारकडे केली आहे. या मागणीस विदर्भातून समर्थन मिळाले आहे. अद्याप सरकारने दखल घेतली नसून अनुदान दिल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके विकत घेता येऊ शकतील.श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.