25 Years of Journalism: मराठी वाचकांच्या मनावर आपला ठसा उमटवणाऱ्या सकाळ माध्यम समुहाच्या डिजिटल माध्यम, ‘ई-सकाळ’ने नुकताच २५ वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. वाचकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ‘ई-सकाळ’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सुप्रसिध्द ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार ‘ई-सकाळ’ आता देशातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी संकेतस्थळ ठरले आहे.
‘कॉमस्कोअर’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्व आहे. ‘कॉमस्कोअर’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल मीडिया विश्लेषण करणारा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे माध्यम जगताचे लक्ष नेहमीच या ‘कॉमस्कोअर’कडे लागून असते. ‘कॉमस्कोअर’च्या ताज्या अहवालानुसार, ‘ई-सकाळ’ मराठीतील अग्रणी वेबईसाट असल्याचे स्पष्ट झाले.
‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार, ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला. लोकमत (११ मिलियन), लोकसत्ता (६.८ मिलियन), टीव्ही९ मराठी (७.४ मिलियन) आणि एबीपी माझा (७.२ मिलियन) यांना ई-सकाळने (१३.५ मिलियन) मागे टाकले आहे.
‘ई-सकाळ’ला १३.५ दशलक्ष युनिक यूजर्सनी पसंती दिली. ‘ई-सकाळ’ महाराष्ट्रातच नाही तर जागतिक पातळीवर मराठीत सर्वाधिक वाचले जाणारे आणि लोकप्रिय ठरलेली वेबसाईट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ठरला आहे. वाचकांपर्यंत वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट आणि बातम्या देण्याच्या वचनबद्धतेमुळे सकाळने मराठी डिजिटल विश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शेती, ग्रामिण व्यवस्था, बाजार, राजकारण, सामाजकारण, क्रीडा, अर्थकारण, मनोरंजन या सर्व पातळ्यांवर सकाळने आपली विश्वासार्हता यापुर्वीच सिध्द केली आहे. आता या विश्वासार्हतेला वाचकांचीही पुष्टी मिळाली आहे.
सकाळ माध्यम समुहाने २६ जानेवारी २००० रोजी मराठीतील डिजिटल माध्यमाची महुर्तमेढ रोवली. मराठीतील डिजिटल मिडियाची खरी सुरुवात इथपासून झाली. इंटरनेट जग बदलू पाहत असताना माध्यमांमध्ये भविष्यात होणाऱ्या बदलांचा, विकासाचा आणि विस्ताराचा अचूक वेध घेत सकाळ माध्यम समुहाने ‘ई-सकाळ’च्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेत पहीला अध्याय सुरु केला. गेल्या २५ वर्षात ‘ई-सकाळ’ने डिजिटल माध्यमात बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्हता जपत वेगवान आणि दर्जेदार माहीती वाचकांपर्यंत पोचवली.
‘कॉमस्कोअर’चे महत्व
डिजिटल माध्यमांमध्ये ‘कॉमस्कोअर’चे विशेष महत्व आहे. ‘कॉमस्कोअर’हा एक मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म आहे. ‘कॉमस्कोअर’ वेबसाईट्सची प्रगती, वाचकांची पसंती आणि त्यांचा सहभाग याचे मोजमाप करतो. त्यानुसार तुलनात्म आकडेवारी जाहीर केली जाते. ‘कॉमस्कोअर’च्या ताज्या अहवालानुसार, ‘ई-सकाळ’ हे वाचकांच्या पसंतीस उतरलेले मराठी न्यूज पोर्टल ठरले आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.