Livestock Market Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Market : मालेगाव बाजार समितीतून ९७ गोवंश जनावरे जप्त

Cattle Market : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १७), मंगळवारी (ता. १८) या दोन दिवसांमध्ये गोवंश जातीची जनावरे आढळली.

Team Agrowon

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १७), मंगळवारी (ता. १८) या दोन दिवसांमध्ये गोवंश जातीची जनावरे आढळली. पोलिसांनी जनावरे जप्त करून दाभाडी येथील गो शाळेत पाठविली. पोलिस व गो-रक्षकांच्या समयसूचकतेमुळे बकरी ईदच्या पूर्वसंध्येलाच संबंधित मालक जनावरे बाजार समितीत सोडून बेपत्ता झाल्याची चर्चा येथे होत आहे.

शहरात बकरी ईदनिमित्त गोवंश जनावरांची खरेदी- विक्री होत असल्याचा आरोप गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला होता. शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची तक्रार गोरक्षकांनी बाजार समितीतील जनावरांच्या बाजारावर कॅम्प पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

कानाला बिल्ले असलेली जनावरेच विक्रीसाठी आणण्याचे आवाहन समितीचे उपसभापती विनोद चव्हाण शेतकरी व व्यापाऱ्यांना केले होते. सोमवारी ८८, तर मंगळवारी ९ गोवंश जनावरे बाजार समितीत आढळून आली. पोलिसांनी बाजार समितीच्या उपसभापती चव्हाण यांना विचारणा केली असता या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात बकरी ईदमुळे ९७ गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याचा बेत अयशस्वी ठरला. त्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. कॅम्प विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. ९७ जनावरे कोठून व कशी आली व कोणाच्या मालकीची आहेत या संदर्भात अजून तपास लागलेला नाही.

जप्त केलेली जनावरे ३४ लाख ३१ हजार रुपये किंमतीची आहेत. या जनावरांना दाभाडी येथील श्री गोशाळा पांजरापोळ येथे पाठविण्यात आले आहे. सोमवारी (ता. १७) दुपारी बारा ते एकच्या सुमारास, तर मंगळवारी (ता.१८) सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जावेद खाटीक यांनी तपासणी केली असता सर्व जनावरे उपाशीपोटी असल्याचे आढळून आले. दरम्यान, सोशल मीडियावर गुंजाळ यांच्यासह पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. अज्ञात जनावर मालकांचा पोलिस शोध घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पावसाचा येलो, ऑरेंज अलर्ट; विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जागर

Natural Farming Campaign: अडीच हजार कोटींचे अभियान केंद्र सरकार राबविणार; २३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार प्रारंभ

Natural Farming : रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता, माणसांचे आरोग्य धोक्यात

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT