Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Insurance : रब्बी पिकांचे ९६ हजारांवर विमा प्रस्ताव

Rabi Season Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा रब्बी हंगामात मंगळवार (ता. २१)पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९६ हजार ७३६ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. तर ७१ हजार ३४४ हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

Team Agrowon

Parbhani News :पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा रब्बी हंगामात मंगळवार (ता. २१)पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९६ हजार ७३६ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. तर ७१ हजार ३४४ हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

ज्वारीच्या विमा प्रस्तावासाठी गुरुवार (ता. ३०)पर्यंत, तर गहू व हरभऱ्यासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणीवर पिकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू (बागायती), हरभरा या पिकांचा तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. मंगळवार (ता. २१)पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे ९६ हजार ७३६ विमाप्रस्ताव दाखल केले.

त्याद्वारे ७१ हजार ३४४ हेक्टरवरील पिकांसाठी २६२ कोटी ३७ लाख ७८ हजार ४९८ रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. त्यात ज्वारीचे ३४ हजार ३४९ विमा प्रस्ताव व विमा संरक्षित क्षेत्र २२ हजार ६३ हेक्टर, गव्हाचे ८ हजार २७७ विमा प्रस्ताव व ३ हजार ९६२ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र, हरभऱ्याचे ५४ हजार ११० विमा प्रस्ताव व ४५ हजार ३१८ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र आहे. उन्हाळी भुईमुगाचे ३८९ प्रस्ताव १८० हेक्टर विमा क्षेत्र आहे.

शेतकरी हिश्‍शाचा ९१ हजार १२४ रुपये, राज्य व केंद्र शासनाच्या हिश्‍शाचा प्रत्येकी १६ कोटी ७६ लाख ३१ हजार ४६० मिळून एकूण २९ कोटी ६१ लाख ५७६ रुपये विमा हप्ता आहे. रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पीकविमा योजना आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सकडून राबविली जात आहे. अधिक माहितीसाठी कंपनीच्या टोल फ्रि क्रमांक १८००१०३७७१२, ई-मेल आयडी customersupportba@icicilombard.com वर ई-मेल करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी केले.

रब्बी पीकविमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टर) (मंगळवार ता. २१ पर्यंत)

तालुका विमा प्रस्ताव संख्या विमा संरक्षित क्षेत्र

परभणी १७६४० १५०५०

जिंतूर १९७१४ १२९१४

सेलू १३०६३ ९६४५

मानवत ६४०४ ५७४७

पाथरी ८५६७ ६७१०

सोनपेठ ३३८२ २७८६

गंगाखेड ९४७६ ५५२२

पालम ८४२१ ४९५९

पूर्णा १०४५८ ७१८८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT