Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याचा ९३ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ

Crop Damage Compensation : नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.

Team Agrowon

Nagpur News : मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानासाठी जिल्ह्यातील ९३ हजार ७१९ शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून ११३ कोटी १८ लाख ४४ हजार रुपये भरपाई मिळाली.

नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. या नुकसानापासून सुरक्षा देण्यासाठी सरकारने पीकविमा योजना सुरू केली. परंतु या विम्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांना मिळत असल्याचा आरोप अनेकदा झाले आहेत. त्यामुळे या योजनेत सुधारणा करण्याची मागणी होती.

त्यानंतर पीकविम्याची नवी योजना शासनाने आणली. मागील वर्षापासून एक रुपयात पीकविमा काढण्यास सुरवात केली. नागपूर जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ३९४ शेतकऱ्यांना विमा काढला. २४४६ कोटी ५२ लाखांचा विमा हप्ता भरण्यात आला. तर ११६२ कोटी ०७ लाख विमा संरक्षित रक्कम होती. तर जिल्ह्यात ९३ हजार ७९१ शेतकऱ्यांना ११३ कोटी १८ लाख ४४ हजार रुपये विम्याचा लाभ मिळाला.

मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विम्यासाठी अधिसूचना काढली होती. ६० हजार ४३७ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याला लाभ मिळाला. यातून त्यांना ४० कोटी ८२ लाख रुपये १३ हजार देण्यात आले.

याच दरम्यान अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे ही मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी २७ हजार २७६ शेतकऱ्यांना ५४ कोटी ११ लाख ८ हजार रुपये देण्यात आले. तर उत्पादनात घट झाल्याने ६ हजार ६ शेतकऱ्यांना १८ कोटी २५ लाख २३ हजार रुपये देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT