Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नाशिकमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

पहिल्या टप्प्यातील नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका निफाड व नाशिक तालुक्यांत आहे. याशिवाय येवला, सिन्नर, देवळा, कळवण, दिंडोरी, त्रंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांत नुकसान आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने मार्चमध्ये ५ ते ८ दरम्यान १,७४६.९ तर १५ ते १९ मार्च दरम्यान ७,४२४.६० हेक्टर असे एकूण ९ हजार १७० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यापोटी १६ कोटींच्या मदतीची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान गहू, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांचे झाल्याचे समोर आले आहे.

पहिल्या टप्प्यातील नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका निफाड व नाशिक तालुक्यांत आहे. याशिवाय येवला, सिन्नर, देवळा, कळवण, दिंडोरी, त्रंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांत नुकसान आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक नुकसान नांदगाव, पेठ व निफाड तालुक्यांत झाले आहे. तर सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्र्वर, इगतपुरी, चांदवड, येवला व सिन्नर हे तालुके प्रभावित झाले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीमध्ये अन्नधान्य पिकांमध्ये गहू, मका, हरभरा व बाजरी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय भाजीपाला पिकांसह कांदा व कांदा बीजोत्पादन क्षेत्राचे मोठे नुकसान आहे. मिरची व टोमॅटोचेही नुकसान झाले आहे. तर फळपीकामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्ष व आंबा पिकांचे आहे.

५ ते ८ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात ३३ टक्क्यांवर ३२३ गावांमध्ये नुकसान झालेले आहे. त्यामध्ये कोरडवाहू पिकांमध्ये १ शेतकऱ्यांचे ०.४० क्षेत्रावर, बागायती पिकांमध्ये २,९९४ शेतकऱ्यांचे १,२३१.१८ हेक्टरवर तर बहुवार्षिक फळपिकांमध्ये ९५१ शेतकऱ्यांचे ५१४.५१ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

त्यासाठी अनुक्रमे ३ हजार, १ कोटी ६६ लाख २१ हजार तर ९२ लाख ६१ हजार अशी एकूण अपेक्षित निधी रक्कम २ कोटी ५८ लाख ८५ हजार इतकी कळविली आहे.

१५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात ३३ टक्क्यांवर ५६० गावांमध्ये नुकसान झाले. त्यामध्ये कोरडवाहू पिकांमध्ये ४२ शेतकऱ्यांचे २१.१ क्षेत्रावर, बागायती पिकांमध्ये १०,४७३ शेतकऱ्यांचे ४,६७९.६९ हेक्टरवर तर बहुवार्षिक फळपिकांमध्ये ८,४७५ शेतकऱ्यांचे २,७२३.९० हेक्टरवर नुकसान झाले आहे.

त्यासाठी अनुक्रमे १ लाख ७९ हजार, ७ कोटी ९५ लाख ५५ हजार तर ६ कोटी १२ लाख ८८ हजार अशी एकूण अपेक्षित निधी रक्कम १४ कोटी १० लाख २१ हजार इतकी कळविली आहे.

६ कोटी ६९ लाखांच्य मदतीची मागणी

मार्च महिन्यात पाउस, वादळी वारे, गारपिटीमुळे बाधित शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीच्या क्षेत्राचे अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवाल तालुकास्तरावरून प्राप्त झालेले आहेत.

लागू करण्यात आलेल्या सुधारित दरांप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ८,५००, बागायत क्षेत्रासाठी १७,००० तर बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी २२,५०० रुपये याप्रमाणे जिल्ह्यासाठी १६ कोटी ६९ लाख ६ हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

नुकसान असे (हेक्टर)

पीकनिहाय नुकसान - ५ ते ८ मार्च - १५ ते १९ मार्च

गहू - ११७८.५१- ७८५.०९

डाळिंब- ०- ५२.४३

आंबा - ७.५०- १,३७८.२८

द्राक्ष - ५०७.०१ - १,२९१.६९

पेरू - ० - ०.५०

लिंबू - ०- १

इतर फळपिके- ०- ८.९०

बागायती मका - २१.८२- २२.७९

कोरडवाहू हरभरा - ०.४० - ०

बागायती हरभरा- ३ - १५.७३

बागायती बाजरी- ०.५०- ०.२९

कांदा - २५० - ३५६६.०३

कांदा रोपे - २.६० - ४४.९०

मिरची - १.९३- १०.५८

टोमॅटो- ०.३५- ५.३२

भाजीपाला व इतर - १९.९७ - २१२.८७

नुकसान कालावधी - बाधित गावे- बाधित शेतकरी - नुकसान (हेक्टर) - अपेक्षित निधी(लाखात)

५ ते ८ मार्च - ३२३ - ३,९४६ - १,७४६.०९- २५८.८५

१५ ते १९ मार्च- ५६०- १८,९९० - ७,४२४.६०- १४१०.२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT