Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ९ लाख २६ हजारांवर पूर्वसूचना

Crop Insurance : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शनिवार (ता. ३१) ते सोमवार (ता. २) या कालावधीत अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांच्या पुरांचे पाणी पिकामध्ये शिरल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले.

माणिक रासवे

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकर कॅलॅमिटीज) या जोखीम बाबी अंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल पीकविमा भरपाई मिळावी यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख ५७ हजार ८०९ पूर्वसूचना तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २ लाख ६९ हजार पूर्वसूचना (पीकविमा दावे) विमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शनिवार (ता. ३१) ते सोमवार (ता. २) या कालावधीत अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांच्या पुरांचे पाणी पिकामध्ये शिरल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमाधारक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत विमा भरपाईसाठी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ६ लाख ५७ हजार ८०९ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्यापैकी ४ लाख ५४ हजार ५२७ विमा दावे स्वीकारले आहेत. एकापेक्षा जास्तवेळा दाखल केलेले १ लाख १४ हजार ६९ पूर्वसूचना नाकारल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ७ लाख ६३ हजार ६२ विमा अर्ज दाखल केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत २ लाख ६९ हजार विमा दावे (पूर्वसूचना) विमा कंपनीकडे दाखल केले आहेत. जिल्ह्यात एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे.

यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ७२ हजार १५ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत. पीकविमाधारक शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स अॅपद्वारे ऑनलाइन, तसेच ऑफलाइन पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्याअनुषंगाने पडताळी करून एकापेक्षा अधिकवेळा तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर ७२ तासांच्या नंतर दाखल केलेल्या तक्रारी विमा कंपनीकडून नाकारल्या जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT