Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा

Kharip Season : या वर्षातील खरीप हंगामात पावसात खंड पडला होता. शिवाय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिल्या जात आहे.

Team Agrowon

Akola News : या वर्षातील खरीप हंगामात पावसात खंड पडला होता. शिवाय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिल्या जात आहे. आतापर्यंत एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी १८ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे जिल्हास्तरीय संयुक्त समितीने सप्टेंबरमध्ये पीकविमा कंपनीला २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश काढले होते. पीकविमा कंपनीने याला प्रतिसाद देत शासनाच्या अधिसूचनेनुसार ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले.

सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्व महसूल मंडलांतील दोन लाख ११ हजार ९६८ शेतकऱ्यांना २ लाख १६ हजार २३२ हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे १२२ कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा कंपनीकडून जमा होणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत दोन लाख ११ हजार ९६८ शेतकऱ्यांपैकी एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी १८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकुल (mid season Adversity) २५ टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याची अधिसूचना ६ सप्टेंबर रोजी लागू केली. यानुसार एचडीएफसी ॲग्रो कंपनीने भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.

तालुकानिहाय पात्र शेतकरी संख्या

तालुका संख्या

अकोला ३३७३१

बार्शीटाकळी २४३६६

मूर्तीजापूर २३४७६

अकोट १५११०

तेल्हारा १७४५०

बाळापूर २५४९०

पातूर १६९२३

एकूण १५६५४६

जमा रक्कम ८६ कोटी १८ लाख ५४ हजार १९२ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT