Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘एफआरपी’चे ८४६ कोटी कारखान्यांकडे थकित

Sugarcane Season : यंदाचा हंगाम संपत आला तरी अद्यापही ११४ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना दिलेली नाही.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाचा हंगाम संपत आला तरी अद्यापही ११४ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना दिलेली नाही. फेब्रुवारीअखेर २०६ पैकी ९२ कारखान्यांनी ‘एफआरपी’ उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. अजूनही ८४६ कोटी रुपये कारखान्यांकडे थकित आहेत.

राज्यात ८० ते ९९ टक्के एफआरपी ६४ कारखान्यांनी, ६० ते ७९ टक्के एफआरपी ३१, तर ५९ टक्क्यांपर्यंत एफआरपी १९ साखर कारखान्यांनी दिली आहे. फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार ८२४ लाख टन उसाचे गाळप झाले. तोडणी वाहतूक खर्च वगळता ‘एफआरपी’ १९ हजार १६९ कोटी रुपये इतकी झाली आहे. यापैकी १८ हजार ३२३ रुपये ऊस उत्पादकांना देण्‍यात आले.

हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी अजूनही कारखान्यांकडून गतीने बिले जमा होत नसल्याचे चित्र आहे. सध्‍या कारखाने हळूहळू बंद होत आहेत. १५ एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होतील, अशी शक्यता आहे. अंतिम टप्प्यात कारखान्यांना उसाचे गाळप करणे कठीण होत आहे.

राज्य बॅंकेने उचलीचा दर कमी केल्याने कारखान्यांना गेल्या महिन्यापासून शंभर रुपये कमी मिळत आहे. यातच साखरेला अजूनही समाधानकारक दर नाही. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अजूनही साखरेला म्हणावी तशी मागणी येत नसल्‍याने कारखाने अद्यापही साखर विक्रीसाठी धडपडत आहेत, असे कारखाना सूत्रांनी सांगितले.

पश्‍चिम महाराष्ट्र वगळता अन्य भागातील कारखान्यांची थकबाकी जादा आहेत. काही कारखाने शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम न देता बंद होत आहेत. या कारखान्यांकडून वेळेत एफआरपी मिळवून घेणे हे आता उत्पादकांपुढे आव्हान असल्याचे सध्याचे चित्र आहे.

अजूनही ९२ कारखान्यांनी ‘एफआरपी’ची रक्कम दिली नसली, तरी ‘आरआरसी’अंतर्गत केवळ एकाच कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने ‘एफआरपी’ची रक्कम प्रलंबित असणाऱ्या साखर कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ऊस उत्‍पादकांतून होत आहे.

केंद्राच्या निर्बंधांमुळे अडचणी

उत्पादनात अनपेक्षित वाढ असल्‍याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर शिल्लक राहण्याची शक्यता असल्‍याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. साखरेला असणारी कमी मागणी व साखरेपासून इथेनॉल करण्याला केंद्राने आणलेली मर्यादा या बाबी कारखान्यांना ‘एफआरपी’ देताना अडचणीच्या ठरत आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे...

- पश्‍चिम महाराष्ट्र वगळता अन्य भागातील कारखान्यांची थकबाकी जादा

- काही कारखाने शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम न देता बंद

- ‘आरआरसी’अंतर्गत केवळ एकाच कारखान्यावर कारवाई

- संबंधित कारखान्यांवर तातडीने कारवाईची मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT