Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नांदेडमधील प्रकल्पांत ८४ टक्के पाणीसाठा

Water Stock : नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पांत तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला गेला होता.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड पाटबंधारे विभागातील एकूण १०४ प्रकल्पांत ६१५.७० दशलक्ष घनमीटरनुसार ८४.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मागीलवर्षापेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यातील मानार, विष्णुपुरी या प्रकल्पांबरोबरच जिल्ह्याशेजारील सिद्धेश्‍वर, येलदरी, इसापूर या मोठ्या प्रकल्पांतही चांगला पाणीसाठा शिल्लक. यामुळे रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता बळावली आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पांत तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला गेला होता. परंतु यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीसाठा झपाट्याने वाढला.

सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत ६१५.७० दशलक्ष घनमीटरनुसार ८४.५६ टक्के शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ७८.४६ दलघमीनुसार ९७.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १२७.४४ दलघमीनुसार ९२.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १२८.८६ दलघमीनुसार ९२.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यांत १.५२ दलघमीनुसार २०.४४ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पांत १४१.५१ दलघमीनुसार ८१.८९ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांत १३७.९१ दलघमीनुसार ७२.६६ टक्के पाणीसाठा आहे.

याबरोबरच नांदेड जिल्ह्याशेजारील परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०२.५४ दलघमीनुसार ९९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ५७.६६ दलघमीनुसार ७१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) प्रकल्पात ९४८.२७ दलघमीनुसार ९८.३६ टक्के साठा झाल्याची माहिती पाटबंधारेकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT