Tembhu Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’च्या पाण्यापासून आठ हजार हेक्टर वंचित

Agriculture Irrigation : बंदिस्त वितरिकेचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवला जात असताना आटपाडी तालुक्यात मात्र अकरा तलावांखालील आठ हजार हेक्टर लाभक्षेत्र बंदिस्त वितरिकेच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे.

Team Agrowon

Sangli News : बंदिस्त वितरिकेचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवला जात असताना आटपाडी तालुक्यात मात्र अकरा तलावांखालील आठ हजार हेक्टर लाभक्षेत्र बंदिस्त वितरिकेच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी बंदिस्त वितरिकेने पाणी देण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली. मात्र निधीअभावी आराखडा बनवण्याचे काम ठप्प आहे.

राज्य सरकारने समन्यायी पद्धतीने बंदिस्त वितरिकेने शेतीला पाणी देण्याचा पहिला यशस्वी प्रयोग आटपाडी तालुक्यात राबवला आहे. २००० मध्ये पाणी चळवळीने वितरिकेद्वारे पुरवठ्याची मागणी केली. त्यासाठी २००५ मध्ये आझाद मैदानावर डॉ. भारत पाटणकर यांनी आनंदराव पाटील, भारत पाटील, अण्णासाहेब पत्की आदींच्या साथीने ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर योजनेला तत्त्वतः मान्यता दिली.

पुढे, आटपाडीचा बंदिस्त वितरिकेचा पॅटर्न उभारला. ‘टेंभू’तून काही गावे वगळली होती. त्यांच्यासाठी अलीकडे मंजुरी आणि निधी मिळून प्रत्यक्ष गतीने काम सुरू आहे. बंदिस्त वितरिकेद्वारे पाणी पुरवठ्याचा ‘आटपाडी पॅटर्न’ सरकार राज्यभर राबवत आहे. मात्र आटपाडी तालुक्यातील ११ तलावांखालील आठ हजार हेक्टर क्षेत्र बंदिस्त वितरिकेपासून वंचित राहिलेले आहे. यात आटपाडी, निंबवडे, दिघंची, कचरेवस्ती, शेटफळे, बनपुरी, घाणंद, अर्जुनवाडी, जांभुळणी आदी तलावांचा समावेश आहे.

काही ठिकाणी कालव्याने पाणी दिले जात होते. मात्र सध्या हे तलाव कोठेच दिसत नाहीत. तलावांखालील क्षेत्राला बंदिस्त वितरिकेने पाणी देण्याची मागणी ‘पाणी चळवळी’ने केली आहे. त्यासाठी सतत पाठपुरवठा आणि बैठका सुरू आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तलावाखालील क्षेत्राचा आराखडा बनवण्यासाठी तत्त्वतः मान्यता मिळाली. त्यासाठी निधी दिला. त्यातून आटपाडी व कचरे वस्ती तलावाचा आराखडा बनवला.

उर्वरित नऊ तलावांचा आराखडा बनवण्याचे काम निधीअभावी दोन वर्षांपासून बंद आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. तो मिळाल्यावर आराखडा तयार होईल. त्यानंतर कामासाठी आणखी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. मात्र आराखड्यासाठीच निधी नसल्याने कामाबाबत संभ्रम आहे. तालुक्यातील अकरा तलावांखालील आठ हजार हेक्टर क्षेत्र ‘टेंभू’च्या पाण्यापासून वंचित आहे.

तलावाखालील क्षेत्राला बंदिस्त वितरिकेद्वारे पाणी देण्यासाठी पाणी चळवळीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कामासाठी तत्त्वतः मान्यता मिळाली, मात्र अपेक्षित निधी दिला नाही. त्यासाठी पाणी चळवळ पुन्हा लढा उभारेल.
- आनंदराव पाटील, पाणी चळवळीचे कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT