Gram Panchayat Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : सोलापुरात सरपंचपदासाठी ७८९ जण इच्छुक

Solapur Local Body Election : सोलापूर जिल्ह्यातील १११ ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.२०) सरपंचपदासाठी ७८९, तर ९८० सदस्यत्त्वासाठी तब्बल ४०३८ अर्ज दाखल झाले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील १११ ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.२०) सरपंचपदासाठी ७८९, तर ९८० सदस्यत्त्वासाठी तब्बल ४०३८ अर्ज दाखल झाले.

सोमवारी (ता.२३) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर २५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. या दिवशी निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. पण सध्या इच्छुकांच्या अर्जांची संख्या विचारात घेता या निवडणुकीत मोठी चुरस वाढणार असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील १०९ गावांच्या सार्वत्रिक आणि दोन गावच्या पोटनिवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दहा तालुक्यांत निवडणुका होत आहेत. फक्त उत्तर सोलापुरात निवडणुका नाहीत.

या निवडणुकीत गावांचा मुख्य कारभारी अर्थात सरपंच थेट लोकनियुक्त असणार आहे, तरीही निवडणुकीतील चुरस कायम आहे. मंगळवेढ्यात २७ गावांच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक १७६, तर सदस्यत्त्वासाठी सर्वाधिक ९५३ अर्ज दाखल झाले आहेत.

त्यानंतर करमाळा तालुक्यात १६ गावच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक १११ अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्यपदासाठी ६३८ अर्ज दाखल झाले आहेत. त्याशिवाय पंढरपूर, मोहोळ, माढा, अक्कलकोट, माळशिरस या तालुक्यांतही बऱ्यापैकी अर्ज दाखल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT