Local Body Election : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व ११ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका अशा २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १६ ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्रे मागविण्यास प्रारंभ होणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक व ११ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक अशा एकूण २९ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. याबाबतची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट व स्थानिक आघाड्या यांच्यामध्ये या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती : रामपूर इटगे, दहिटणे, हसापूर, नन्हेगाव, जकापूर, कंठेहळ्ळी, तळेवाड, बिंजगेर / हालहळ्ळी, जेऊरवाडी, करजगी, कुडल, शावळ, घुगरेगाव, केगाव बु, केगाव खु, कलकर्जाळ, धारसंग, म्हैसलगी अशा एकूण १८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुकीत सरपंचपद थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. तसेच कोर्सेगाव, सातनदुधनी, संगोगी ब., तोरणी, उडगी, नागनहळळी, जेऊर, कल्लप्पावाडी, हालहळ्ळी अ., आंदेवाडी खु., हंजगी या अकरा गावांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
...असा असणार निवडणूक कार्यक्रम
अक्कलकोट तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध प्रसिद्ध केली. १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल करणे, २३ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र छाननी, २५ ऑक्टोबरला दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, आवश्यकता भासल्यास ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी व निकाल घोषित ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.