Milk Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : नाशिक विभागात दूध उत्पादकांना ७७ कोटींचे अनुदान

Team Agrowon

Nashik News : राज्य सरकारने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील १ लाख २९ हजार दूध उत्पादकांना तब्बल ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेपासून वंचित राहिलेल्या उत्पादकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणत: एवढेच दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यःस्थितील गायीचे दूध २७ ते ३० रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होते. हा दर गृहित धरून राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची विधिमंडळात घोषणा केली.

यापूर्वीही त्यांनी या उत्पादकांना अनुदान दिले आहे. विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील १ लाख २९ हजार ३१९ दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. विभागातील ५ लाख २६ हजार ५१९ गायींची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे करण्यात आली होती.

या योजनेनंतर पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे ‘टॅगिंग’ करण्याची प्रक्रिया केली होती. दूध देणाऱ्या सर्वच जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. नरवाडे यांनी सांगितले. पशुधनाची माहिती पोर्टलवर अपडेट करून १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. २६ मार्चपासून ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले होते.

आता पोर्टल सुरू झाले असून, जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी योगेश नागरे यांनी केले आहे. राज्य सरकारने गायीच्या दूध विक्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी व दूध उत्पादकांना १ जुलैपासून अनुदान देण्याची नव्याने घोषणा केल्यामुळे पुन्हा लाभ मिळणार आहे.

विभागात ९७ दूध संकलन केंद्रे

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण ९७ सहकारी दूधसंघ व खासगी दूध प्रकल्प आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ७४ दूध संघ आहेत. त्यापाठोपाठ नाशिक (१८), जळगाव (२), धुळे व नंदुरबार या ठिकाणी (३) दूध संघ आहेत.

जानेवारी ते मार्चमधील अनुदानापासून वंचित राहिलेल्या दूध उत्पादकांनी संबंधित (एलडीओ) सहकारी दूध संघाशी संपर्क करावा. जास्तीतजास्त उत्पादकांनी अनुदानाचा लाभ घ्यावा. प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क करून १५ जुलैपर्यंत आपली माहिती अपलोड करावी.
श्रीकांत शिरपूरकर, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT