Grape Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season : राज्यातील द्राक्ष हंगाम ७० टक्के आटोपला

Grape Farming : राज्यातील द्राक्ष हंगामात अंतिम टप्प्याकडे येऊ लागला आहे. आजअखेर द्राक्षाच्या एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री उरकली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील द्राक्ष हंगामात अंतिम टप्प्याकडे येऊ लागला आहे. आजअखेर द्राक्षाच्या एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री उरकली आहे. द्राक्षाचे दर टिकून असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर विभाग वगळता इतर विभागातील एप्रिलच्या मध्यापर्यंत द्राक्षाची विक्री पूर्ण होईल, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

राज्यात द्राक्ष संघाच्या म्हणण्यानुसार साडेचार लाख एकरांवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामात निसर्गाच्या कचाट्यात यंदाचा द्राक्ष हंगाम सापडला. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत उत्तमरीत्या बागा साधल्या. हंगामाच्या प्रारंभीच्या काळात द्राक्ष फारशी गती नव्हती. त्यानंतर अर्थात गेल्या महिन्यापासून द्राक्ष हंगामाला गती आली. देशभरातील बाजारपेठेत द्राक्षाला मागणी असून उठावही होत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला उठाव असल्याने द्राक्षाचे दर टिकून आहेत.

राज्यात साडेचार लाख एकर क्षेत्र ग्राह्य धरले, तर २ लाख ७० हजार एकरांवरील द्राक्षाची विक्री झाली आहे. तर आजमितीस १ लाख ८० हजार एकरांवरील द्राक्ष विक्री करण्याचे बाकी आहे. सध्या द्राक्षाचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दर वाढण्याची अपेक्षा होती. मात्र दर वाढीची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. परंतु येत्या काळात दर वाढतील अशी अपेक्षा आहे.

सांगली, पुणे, नाशिक या तिन्ही विभागांतील द्राक्ष विक्रीचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्याकडे आला आहे. सोलापूर विभागात द्राक्ष काढणी उशिरा सुरू होते, आणि उशिरा संपते. सद्यःस्थितीला सोलापूर विभागात २० टक्के द्राक्षाची विक्री झाली आहे. त्यामुळे सोलापूर विभाग वगळता इतर विभागातील एप्रिलच्या मध्यापर्यंत द्राक्षाची विक्री पूर्ण होईल. तर सोलापूर विभागातील द्राक्ष हंगाम मेच्या मध्यापर्यंत सुरू राहील, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० रुपयांनी दर अधिक

गत वर्षीच्या हंगामातही निसर्गाचा फटका द्राक्ष बागेला बसला होता. परंतु द्राक्षाचे उत्पादनही चांगले होते. त्यामुळे द्राक्षाला प्रति किलोस ५० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत असे दर होते. यंदाही द्राक्ष पिकावर नैसर्गिक संकट ओढावले, त्यामुळे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले. परिणामी द्राक्षाच्या दरात वाढ झाली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा प्रति किलोस २५ ते ३० रुपयांनी अधिक दर आहेत.

द्राक्षाचेही दर टिकून

सोलापूर विभागात निर्यातक्षम पांढरी (गोल) द्राक्षाला प्रति किलोस ८० ते ९५ पर्यंत, तर नाशिक विभागात ७० ते ८५ रुपये दर आहे. पांढरी (लांब) द्राक्षाला प्रति किलोस पाच रुपयांनी दर अधिक आहेत. निर्यातक्षम द्राक्षासह देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाचे दर टिकून आहेत.

विभागनिहाय द्राक्ष हंगाम विक्री दृष्टिक्षेप

विभाग... टक्केवारी

सांगली...८०

पुणे...८०

सोलापूर...४०

नाशिक...७०

द्राक्षाचे दर प्रति किलोत

पांढरी (गोल)... ४० ते ५० रुपये

रंगीत...१०० ते १२५

पांढरी (लांब) ...६५ ते ७५ रुपये

राज्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षावर आलेले आस्मानी संकटावर मात करत बागा साधल्या. द्राक्षाचे उत्पादन घटल्याने काहीचा फटका बसला असून दरामुळे काही शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. हंगाम अंतिम टप्प्याकडे येऊ लागला असून दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
- कैलास भोसले अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Seed Subsidy: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारची मोफत बियाणे योजना; शेतकऱ्यांना ४ हजार, तर शेतकरी गटांना मिळणार २० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान

Grape Disease Management: फळछाटणीनंतरचे केवडा रोग व्यवस्थापन

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत; महिला-बालविकास विभागाच्या सात योजनांना कात्री

Veterinary Technology: पशू आनुवंशिक सुधारणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT