Ravikant Tupkar  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance News : तुपकरांच्या आंदोलनाचा धसका, पीक विमा कंपनीकडून ७० कोटी रूपये भरपाई मंजूर

Farmer Leader Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने AIC या पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Crop Insurance Update : राज्यात मागच्या काही दिवसांत झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढल्याने त्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते.

परंतु विमा कंपन्यांनी हे पैसे देण्यासा टाळाटाळ केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विमा कंपन्यांनी धसका घेऊन पैसे वाटप सुरू केले आहे.

तुपकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने AIC या पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मागच्या काही महिन्यात अवकाळी पावसाने सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. याप्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा कंपण्यांना इशारा दिला होता. येत्या १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, १६ जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारण्याचा निर्णय तुपकरांनी घेतला होता.

यामध्ये जर शेतकर्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला राज्यातील सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला आहे.

याची दखल घेत AIC पीक विमा कंपनीकडून तातडीने निर्णय घेत बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात रविकांत तुपकर म्हणाले, ''AIC पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५०,७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. कंपनीने १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे लेखी पत्र मला १२ जून रोजी मिळाले.

सातत्याने केलेल्या आंदोलनामुळेच बुलढाणा जिल्ह्यातील १,९३,४३१ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत कंपनीकडून १५७ कोटी ८७ लाख रुपये जमा झाले आहेत. मुंबईत १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या धसक्यामुळेच आता कंपनीने ७० कोटी रुपये मंजूर केले आहे. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे.``

पण जोपर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तसेच उशिरा तक्रार केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या ११,००० शेतकऱ्यांच्या व इतर १५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपनी काही निर्णय घेत नाही, तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई व इतर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनाच्या भूमिकेकर आम्ही ठाम आहोत, असे तुपकर म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी (ता. १३) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सततच्या पावसामुले झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेने हा प्रश्न लावून धरल्यामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा तुपकर यांनी केला आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, जेणेकरून पेरणीसाठी हे पैसे शेतकऱ्यांना उपयोगात येतील, असे तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT