The Babasaheb Deshmukh Cooperative Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Babasaheb Deshmukh Cooperative Bank : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला ७ कोटींचा नफा

Team Agrowon

Sangli News : आटपाडी येथील दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७ कोटी ७२ लाखांचा नफा झाला असल्याचे बँकेचे संस्थापक, संचालक अमरसिंह देशमुख यांनी सांगितले.

श्री. देशमुख म्हणाले, की बँकेची आर्थिक स्थिती रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे भक्कम असल्यामुळेच व रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन बँकेने केल्याने रिझर्व्ह बँकेने पंढरपूर व जत या दोन नवीन शाखा उघडण्यास या आर्थिक वर्षात मंजुरी दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासाठी पूर्वपरवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेल्या या दोन नवीन शाखा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँक लवकरच सुरू करणार आहे. या आर्थिक वर्षात आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ पडूनही बँकेने बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

बँकेच्या सध्या १० शाखा व प्रधान कार्यालय असून पंढरपूर व जत या दोन नवीन शाखांमुळे बँकेचा व्यवसाय वाढविण्यास मदत होणार आहे. मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या ठेवी ४०२.८४ कोटी रुपये, कर्जे २७८.२२ कोटी रुपये, भागभांडवल १८.१५ कोटी रुपये, स्वनिधी ३७.९३ कोटी रुपये, गुंतवणूक १६३.१६ कोटी रुपये,

ढोबळ नफा ७.७२ कोटी रुपये तर निव्वळ नफा ४.७९ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचा नेट एनपीए ०.०० टक्के असून बँकेने सतत २० वर्षे नेट एनपीए ०.०० टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. बँकेचा CRAR RBI नियमाप्रमाणे १० टक्के आवश्यक असताना तो १५.८७ टक्के आहे.

बँकेला ऑडिट वर्ग सतत ‘अ’ मिळालेला असून बँकेने मार्च २०२४ अखेर ६८१.०६ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. संचालक मंडळाने २०२३-२४ साठी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने ग्राहकांना मोबाइल बँकिंग यासह सर्व डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील-आडमुठे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे सर्व कर्मचारी, सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या सहकार्यामुळेच बँकेने प्रगती केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT