Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणात ६८.४८ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात दमदार पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे पाण्याने भरून वाहिली होती. सर्व प्रमुख धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Koyna Dam Satara News : जिल्ह्यातील गतवर्षीच्या तुलनेत कोयना, धोम धरणात कमी, तर कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी धरणांत जास्त पाणीसाठा (Koyna Dam Water Stock) उपलब्ध आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाई (Water Shortage) होऊ नये यासाठी धरणांतील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातून सिंचनासाठी दोन हजार क्युसेकने पाण्याचा विर्सग केला जात आहे.

जिल्ह्यात दमदार पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे पाण्याने भरून वाहिली होती. सर्व प्रमुख धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना राज्यासाठी लागणारी वीजनिर्मिती तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण सर्वांत महत्त्वाचे आहे. या धरणात गतवर्षी ७७.८६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होते.

तुलनेत यावर्षी पाच टीएमसीने कमी असून, धरणात ७२.०८ टीएमसी पाणी आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. यामुळे या धरणातून वीजनिर्मिती तसेच टंचाईसाठी करावा लागणारा पाणीपुरवठा याचे नियोजन करावे लागणार आहे.

कोयना धरणाप्रमाणे धोम धरणांतही पाणीसाठा कमी शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षी तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी धोम धरणात १०.२८ तर यावर्षी ९.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.

उरमोडी गतवर्षी ५.८५, तर या वर्षी ७.४१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कण्हेर, तारळी, धोम-बलकवडी याही प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.

कण्हेर धरणात गतवर्षी ६.१५, तर या वर्षी ६.२५, तारळी धरणात गतवर्षी ३.६७, तर या वर्षी ४.६० व धोम-बलकवडी धरणात १.२४, तर या वर्षी २.६१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रमुख धरणांतील पाण्याची एकूण टक्केवारी

कोयना - ६८.४८, धोम-७२.६०, उरमोडी-७४.३३, कण्हेर-६१.६१,

धोम-बलकवडी-६३.५१, तारळी- ७८.६२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Farmers Protest: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी

KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार

SCROLL FOR NEXT