सांगली जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : पुणे विभागात ६८ टक्के पेरण्या

Rabi Season : चालू वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने आणि ऑक्टोबर हिटमुळे जमीनीत पुरेसा ओलावा राहिलेला नाही. यामुळे रब्बीच्या पेरण्या धीम्या गतीने सुरू आहेत.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : चालू वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने आणि ऑक्टोबर हिटमुळे जमीनीत पुरेसा ओलावा राहिलेला नाही. यामुळे रब्बीच्या पेरण्या धीम्या गतीने सुरू आहेत. आतापर्यंत विभागात रब्बीच्या सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी ७ लाख ८० हजार ४०८ हेक्टर म्हणजेच अवघ्या ६८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या काही प्रमाणात थंडी वाढल्याने पेरण्या वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

नगर खरीप हंगामातील भात पिकाची ७० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. तूर पीक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहे. कापूस पिकाच्या ९५ टक्के वेचण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पीक पोटरी अवस्थेत असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गहू पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून पेरणी झालेल्या क्षेत्रातील गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

काही भागात गहू पीक ओंब्या लागण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून पेरणी झालेल्या क्षेत्रातील हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. करडई, सुर्यफूल व तीळ पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक कापणी अंतिम टप्यात असून ९० टक्के क्षेत्रावरील कापणी पूर्ण झाली आहे. भुईमूग पिकाची ९८ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गहू पिकाची पेरणी चालू आहे. सद्यःस्थितीत मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये खरीप हंगामातील तूर पीक शेंगा लागणीच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी पीक पोटरी अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. सद्यःस्थितीत गहू पीक रोप व वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक शेंडा खुडणे ते वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे.

पुणे विभागात झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :
जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के
नगर -- ४,५८,६३६ --- ३,२४, ४८० -- ७१
पुणे  -- २,२९,७१२ -- १,२२,२४० -- ५३
सोलापूर -- ४,६०,९१८ --३,३३,६८९ -- ७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT