Flood funds in Gujarat, Manipur and Tripura Agrowon
ॲग्रो विशेष

Floods in Gujarat, Manipur and Tripura : केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून गुजरात, मणिपूर आणि त्रिपुराला ६७५ कोटींचा निधी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : यंदा पावसाने देशभर थैमान घातला. महाराष्ट्रासह आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये पूर आला होता. तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती पहायला मिळत आहे. यामुळे येथील राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. पण केंद्राने गुजरातवर मेहरनजर करत ६०० ६०० कोटी रुपयांचा मदत निधी दिला. तर मणिपूर आणि त्रिपुरा राज्याच्या तोंडाला पाने पूसत दोघाच फक्त ७५ कोंटीचा निधी दिला आहे. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून केंद्राच्या वाट्यातील देण्यात आला आहे.

यंदा देशभर चांगला पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला. यामध्ये केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठी वित्त आणि जीवितहानी झाली. तर महाराष्ट्रासह आसाम, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये पूर आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी केंद्र सरकार पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली होती.

यानंतर आता केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) मधून गुजरातला ६०० कोटी रुपये, मणिपूरला ५० कोटी रुपये आणि त्रिपुराला २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे ठरवले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून देखील आगाऊ रक्कम मंजूर केली आहे.

यंदा केंद्र सरकारने एसडीआरएफमधून २१ राज्यांना ९०४४.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एनडीआरएफकडून १५ राज्यांना ४५२८.६६ कोटी रूपये आणि राज्य आपत्ती निवारण निधी एसडीएमएफमधून ११ राज्यांना १३८५.४५ कोटी रुपये दिले आहेत.

तसेच आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. यासाठी आंतर-मंत्रालयीय केंद्रीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून राज्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मदत करतील.

याशिवाय या आंतर-मंत्रालयीय केंद्रीय समित्या लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालला पाठवण्यात येणार आहेत. अलीकडेच येथे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे आणि पाहणीकरून मुल्यांकन समिती करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

Onion Subsidy : राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Rabbi Season : रब्बीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती शक्य

SCROLL FOR NEXT