Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : गतवर्षीच्या तुलनेत धरणांत ६५.५९ टीएमसी साठा कमी

Water Storage in Pune : सध्या पुणे जिल्ह्यातील धरणांत १२०.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळा संपून जवळपास तीन महिने होत आले आहे. या कालावधीत धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील धरणांत १२०.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

जिल्ह्यात एकूण २७ धरणे आहेत. यात उजनी धरणाचा समावेश आहे. सर्व धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. यंदा सर्व धरणे मिळून १६८.६४ टीएमसी म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यापैकी सध्या १२०.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी याच काळात या धरणांत १८६.२३ टीएमसी म्हणजेच ९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

येत्या काळात पाण्याचा वापर वाढणार असून, पाणीपातळी कमी होणार आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असण्याची चिन्हे असल्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात कमीअधिक पाऊस पडला. तर बारामती, पुरंदर भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु सप्टेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे.

यात उजनी धरणांतील पाणीसाठ्याचा समावेश होता. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची फारशी अडचण भासणार नसली, तरी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून कळविण्यात येत आहे.

उजनीत उपयुक्त पाणीसाठा १७ टक्क्यांपर्यंत

गेल्या तीन महिन्यांत पाण्याचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सध्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर ९.४८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर, सोलापूर भागांतील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न उभा राहणार असल्याचे चित्र आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील धरणांत २२.१९ टीएमसी म्हणजेच ७६ टक्के पाणीसाठा आहे. तर नीरा खोऱ्यातील धरणांत ३४.६० टीएमसी म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांत २८.६२ टीएमसी म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

Soil Testing: मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

SCROLL FOR NEXT