Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : नगर जिल्ह्यात आचारसंहिताभंगाच्या ६४ तक्रारी दाखल

Team Agrowon

Nagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी ई-मेल, फोन आणि मोबाइल ॲपद्वारे सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता भंग कक्षाकडे आतापर्यंत ६४ तक्रारी आल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी मोबाईल ॲपद्वारे आल्या आहेत.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कक्ष उभारण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी नगर येथे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येऊन अंमलबजावणी करण्यात येत आहे.

विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावण्यास बंदी घातली आहे. मेलद्वारे १४ तक्रारी आल्या आहेत. फोनद्वारे दोन, तर प्रत्यक्षात कक्षात येऊन एका व्यक्तीने तक्रार नोंदविली आहे. सर्वाधिक तक्रारी मोबाईल ॲपद्वारे ४७ तक्रारी आल्या आहेत.

आलेल्या तक्रारीत पक्षाचे चिन्ह, बॅनर लावलेले असणे, विकास कामांचे भूमिपूजनाच्या कोनशीला न झाकणे, नेत्यांचे फोटो असलेले फलक काढले नाहीत. राजकीय पक्षांचे चिन्ह, नेत्यांचे फोटो या अनुषंगाने सर्वाधिक तक्रारी आहेत. व्यक्तीगत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे व्यक्तिगत तक्रारी येत नाहीत.

लोकसभा निवडणुकीबाबत आचारसंहितेबाबत ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर तसेच सी व्हीजील ॲपवर आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या तक्रारी असल्यास नागरिकांना या कक्षाकडे दाखल करता येतील.
- सुहास मापारी, अप्पर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT