Marathwada Rainfall News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ३८ मंडलांत बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका पाऊस झाला. पावसाच्या लहरीपणामुळे काही भागांत झालेला पाऊस संपूर्ण मंडलात झाला नसल्याने या पावसाचा पिकांना फारसा उपयोग होण्याची शक्यता नाही..प्रदीर्घ खंडानंतर झालेल्या या हलक्या पावसामुळे कोमेजलेल्या व वाळून गेलेल्या पिकांना फारसा फायदा होणार नाही. मात्र, काही भागांत पुन्हा पाऊस झाल्याने वरुणराजाची कृपा होते की काय, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे..Heavy Rain: छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर; एका मंडलात अतिवृष्टी.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद व फुलंब्री तालुक्यांतील १४ मंडलांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, बदनापूर, घनसावंगी व मंठा तालुक्यांतील १६ मंडलांचा, तर बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, माजलगाव, परळी व शिरूर कासार तालुक्यांतील आठ मंडलांचा समावेश आहे..Rain Update: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत पावसाचे धुमशान.छत्रपती संभाजीनगर जिल्हा :उस्मानपुरा ५.३, भावसिंगपुरा २.५, चिकलठाणा ६.५, पिसादेवी ३.५, वरुडकाझी ३.५, आसेगाव ३.५, लोणी खुर्द २.८, कन्नड ९.५, चापानेर २.५, देवगाव ४, चिकलठाणा ९, वेरूळ ७.८, फुलंब्री ४, पिरबावडा २४..जालना जिल्हा :वागरूळ ६, नेर २.५, शेवली ४, रामनगर ७.५, पाचनवडगाव ५.५, रोहिलगड २.८, वडिगोद्री ५, सुखापुरी ५.५, वाटूर ४.८, सातोना ४.५, शेलगाव १०, दाभाडी १९, रोशनगाव ४, अंतरवली टेंभी ५.५, तीर्थपुरी ५.५, पांगरी गोसावी २.५..बीड जिल्हा :टाकळसिंग ५, धानोरा ३.५, पिंपळा ३.८, चकलांबा २.८, उमापूर २.८, दिंद्रूड २.५, पिंपळगाव गाडे ३, रायमोहा ५.३..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.