Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीककर्जाचे ६३० कोटींचे उद्दिष्ट

Rabi Season 2023 : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ६३० कोटी रुपयाचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने रब्बीत ज्वारी, हरभरा अशा कमी पाण्यावरील पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ६३० कोटी रुपयाचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेकडून कर्जवाटपाची प्रकिया सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बँकेने रब्बीसाठी एकूण ५९८ कोटी ३५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जात जवळपास ३२ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

यंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या जवळपास ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ११ टक्के दराने वाटप करत आहेत.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दर वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात.

परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचे नियोजन करून पिके घेतात.

तालुकानिहाय रब्बीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ः

तालुका --- उद्दिष्ट

आंबेगाव --- ४८ कोटी ४४ लाख २५ हजार रुपये,

बारामती --- ६७ कोटी १८ लाख रुपये

भोर --- २५ कोटी ३६ लाख ७५ हजार रुपये

दौंड --- ७६ कोटी ९० लाख २५ हजार

हवेली --- २० कोटी ६५ लाख ५० हजार

इंदापूर --- ९५ कोटी ७२ लाख रुपये

जुन्नर --- ८० कोटी ७९ लाख ५० हजार

खेड --- ६० कोटी २४ लाख ७५ हजार

मावळ --- १७ कोटी ८२ लाख २५ हजार

मुळशी --- ११ कोटी २५ लाख ७५ हजार

पुरंदर --- ३७ कोटी २३ लाख ५० हजार

शिरूर --- ८३ कोटी ६२ लाख ७५ हजार

वेल्हा --- ४ कोटी ७४ लाख ७५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT