Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सातारा जिल्हातील ६३ मंडले अग्रिमसाठी पात्र

Advance Crop Insurance : खरिपात पावसाने अपेक्षाभंग केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने पिके वाळून गेली आहेत.

विकास जाधव 

Satara News : खरिपात पावसाने अपेक्षाभंग केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने पिके वाळून गेली आहेत. या नुकसानग्रस्त गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

यामध्ये जिल्ह्यातील ९९ मंडलांपैकी ६३ मंडलांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. तर नऊ मंडलांत २१ दिवसांपेक्षा कमी काळात पाऊस झाला असलातरी तेथील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

या ६३ मंडलांतील एक लाख ७२ हजार शेतकरी विमा रक्कमेस पात्र ठरले असून, भरपाईची २५ टक्के रक्कम देण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचना दिल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते. त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी सरकारने एक रुपयात पीकविमा योजना काढली होती. यामध्ये जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग भुईमूग, सोयाबीन खरीप कांदा या पिकांचा समावेश होता.

या योजनेत जास्ती जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. यातून जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार ६६८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पिके अडचणीत आली आहेत.

अनेक गावांत २१ दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही. यामुळे पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली जात होती. हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील ९९ पैकी मंडलांपैकी ६३ मंडलांत २१ दिवस पाऊस झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या ६३ मंडलांत एक लाख ७२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर २१ दिवसापेक्षा कमी खंड असलेली मात्र पिकांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा नऊ मंडले आहेत. या मंडलांनाही अग्रिम रक्कम मिळावी अशी मागणी केली जात आहे. मात्र विमा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात असल्याने या मंडलाचे काय होणार हे पाहावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तंबी...

शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी सचिव, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे.

या बैठकीत कंपन्यांनी सर्वेक्षण व्यवस्थित झाली नसल्याची कारणे दिल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याची तंबी दिली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अग्रिम रक्कम दिवाळीपर्यंत दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस न झालेली मंडले तालुकानिहाय नावे

सातारा- खेड, वर्ये, वडूथ, तासगांव, सातारा, कण्हेर

कोरेगाव- कोरेगाव, रहिमतपूर, वाठार-किरोली, किन्हई, सातारारोड, पिंपोडे ब्रु, वाठार स्टेशन, शिरंबे,

खटाव- वडूज, पुसेगाव, खटाव, बुध, औंध, मायणी, कलेढोण, कातरखटाव, पुसेसावळी

कऱ्हाड- काले, येळगाव, उंडाळे, मलकापूर, कऱ्हाड, सुपने, मसूर, कवठे, इंदोली, सैदापूर, कोपर्डे हवेली, शेणोली, कोळे

पाटण- चाफळ, ढेबेवाडी, मल्हारपेठ, कुठरे, तारळे.

वाई- भुईंज, ओझर्डे, पाचवड, वाई, सुरूर

जावळी- आनेवाडी, कुडाळ

खंडाळा- खंडाळा, वाठार ब्रु, लोणंद.

फलटण- राजाळे, तरडगाव, आसू, फलटण, होळ, आदर्की, बरड.

माण- दहिवडी, मलवडी, आंधळी, गोंदवले, कुक्कडवाड.

२१ दिवसांपेक्षा कमी खंड,पण ५० टक्के अधिक नुकसान मंडले

सातारा - अपशिंगे, अंबवडे, शेंद्रे, फलटण- गिरवी, वाठार निंबाळकर

माण - म्हसवड, वरकुटे मलवडी, शिंगणापूर, मार्डी.

जिल्ह्यातील एकूण मंडले ९९

२१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस न झालेली मंडले ६३

२१ दिवसांपेक्षा कमी खंड पण ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान मंडले....९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT