Mahavikas Aghadi  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असूनही अद्याप महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असूनही अद्याप महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. तर, महाविकास आघाडीने शनिवारी ६३ जागांवरील उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली.

दरम्यान, परांडा मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाने याआधीच उमेदवार जाहीर केला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राहुल मोटे यांना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या अंतिम यादीबाबत चर्चा करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जागांच्या आदलाबदलीबाबत आमची चर्चा सुरू आहे, यातून काहीतरी मार्ग निघेल असे सांगितले.

काँग्रेसने शनिवारी (ता. २६) सकाळी २३ जागांवरील उमेदवार जाहीर केले. यामध्ये भुसावळ : राजेश मानवतकर, जळगाव : स्वाती वाकेकर, अकोट : महेश गांगणे, वर्धा : शेखर शेंडे, सावनेर : अनुजा केदार, नागपूर दक्षिण : गिरीश पांडव, कामठी : सुरेश भोयर, भंडारा : पूजा ठावकर, अर्जुनी मोरगाव : दिलीप बनसोड, आमगाव : राजकुमार पुरम, राळेगाव : वसंत पुरके, यवतमाळ : बाळासाहेब मांगूळकर, आर्णी : जितेंद्र मोघे, उमरखेड : साहेबराव कांबळे, जालना : कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख, वसई : विजय पाटील, कांदिवली पूर्व : काळू बधेलिया, चारकोप : यशवंत सिंग, सायन कोळीवाडा : गणेश यादव, श्रीरामपूर : हेमंग ओगले, निलंगा : अभयकुमार साळुंखे, शिरोळ : गणपतराव पाटील.

‘प्रत्येकी ९० चा फॉर्म्युला नाही’

उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येकी ९० जागांचा फार्म्युला ठरल्याचे पत्रकारांना सांगितले. तर शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी असा फार्म्युला ठरला नाही, जेथे ज्याची ताकद तेथे उमेदवारी हेच आमचे सूत्र आहे. मेरिटनुसार जागावाटप होत आहे. त्यामुळे जागा कमी-अधिक होतील असे सांगितले. तसेच थोरात यांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेऊन काही जागांवर उमेदवार अदलाबदलीबाबत चर्चा केली. काही जागांवर उमेदवार बदलू शकतात असेही ते म्हणाले.

दुसऱ्या यादीत राष्ट्रवादीचे २२ उमेदवार

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन २२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये एरंडोलमधून सतीश पाटील, गंगापूर : सतीश चव्हाण, शहापूर : पांडुरंग बरोरा, परंडा : राहुल मोटे, बीड : संदीप क्षीरसागर, आर्वी : मयुरा काळे बागलान : दीपिका चव्हाण, येवला : माणिकराव शिंदे, सिन्नर : उदय सांगळे, दिंडोरी : सुनीता चारोसकर, नाशिक पूर्व : गणेश गीते, उल्हासनगर : ओमी कलाणी, जुन्नर : सत्यशील शेरकर, पिंपरी : सुलक्षणा शीलवंत, खडकवासला : सचिन दोडके, पर्वती : अश्विनी कदम, अकोले : अमित भांगरे, अहिल्यानगर शहर: अभिषेक कळमकर, माळशिरस : उत्तम जानकर, फलटण : दीपक चव्हाण, चंदगड : नंदिनी बाभुळकर, इचलकरंजी: मदन कारंडे.

शिवसेना ठाकरे गटाचे १८ उमेदवार जाहीर

शिवसेना ठाकरे गटाने १८ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात भाजपमधून शिवसेनेत आलेल्या अनिल गोटे यांना धुळ्यातून उमेदवारी दिली आहे. तसेच चोपडा : राजू तडवी, जळगाव शहर : जयश्री महाजन, बुलडाणा : जयश्री शेळके, दिग्रस : पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली : रूपाली पाटील, परतूर : आसाराम बोराडे, देवळाली : योगेश घोलप, कल्याण पश्चिम : सचिन बासरे, कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, वडाळा : श्रद्धा जाधव, शिवडी- अजय चौधरी, भायखळा : मनोज जामसुतकर, श्रीगोंदा : अनुराधा नागावडे, कणकवली : संदेश पारकर, वर्सोवा : हरुन खान, घाटकोपर पश्चिम ः संजय भालेराव आणि विलेपार्ले : संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT