BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजले असून महायुतीसह महाविकास आघाडीत जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. यादरम्यान सर्वात आधी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
BJP Candidate List For Maharashtra Assembly Elections 2024
BJP Candidate List For Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून ते त्यांचा पारंपारीक मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिममधून रिंगणात उतरतील. याचबरोबर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

तर राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीला रंग चढताना दिसत आहे. विविध पक्षांमधून ऑउट गोईंग सुरू झाले असून नेत्यांचे इनकनिंग देखील पाहायला मिळत आहे. यादरम्यान भाजपने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ९९ उमेदवारांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यात फडणवीस, राम कदम, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांच्यासह भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत नव्या चेहऱ्यांसह जुन्या चेहऱ्यांना ही संधी देण्यात आली आहे. तर काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

BJP Candidate List For Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उमेदवार कोण असेल याकडे लक्ष

१३ महिलांना संधी

भाजपने पहिल्या यादीत १३ महिलांना संधी दिली आहे. ज्यात भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डिकर (जिंतूर), अनुराधाताई चव्हाण (फुलंबरी), सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगांव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजले (शेवगावं), प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा), नमिता मुंदडा (कैज), यांच्या नावाचा समावेश आहे.

हाय होल्टेज लढती

भाजपने ९९ उमेदवारांची लिस्ट जाहीर करत निवडणूक हाय होल्टेज करण्यासाठी तगडे उमेदवार दिले आहेत. गेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली नव्हती. पण पक्षाने यंदा त्यांना कामठी (जि.नागपूर) मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. यावेळी विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचा पत्ता पक्षाने कापला आहे.

BJP Candidate List For Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत कोणतीही तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

अलम महाडीक विरूद्ध ऋतूराज पाटील

तसेच फडणवीस यांच्या विरोधात विरुद्ध माजी गृहमंत्री अनिल देशमुख लढण्याची शक्यता आहे. यामुळे येथे काटे की टक्कर होईल. तर कोल्हापुरात नव्यानेच भाजपमध्ये प्रवेशे केलेल्या राहुल प्रकाश आवाडेंना संधी देण्यात आली आहे.

तर कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून माजी आमदार अमल महाडीक यांना सतेज पाटील यांच्या मनसूब्यांना सुरूंग लावण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. येथे थेट लढत अलम महाडीक विरूद्ध ऋतूराज पाटील यांच्यात होईल. जी ओव्हर करंट असेल.

राम शिंदे यांनी थोपाटले दंड

अशीच लढ कर्जत जामखेड मतदार संघात देखील पाहायला मिळेल. येथे आमदार रोहीत पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राम शिंदे यांना तिकीट दिले आहे. तर याआधीच राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्याव्रोधात थोपाटले दंड होते. आतातर तिकीट जाहीर झाले आहे. यामुळे या हाय होल्टेज लढतींसह राज्यात काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com