PM Awas Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Housing Scheme : सोलापुरात ६२ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वितरण

PM Awas Scheme : पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा-२ या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार ९६७ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा-२ या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार ९६७ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५०० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले.

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्याच अनुषंगाने सोलापुरातही नियोजन भवनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या चार तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र देण्यात आले.

या वेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील श्रीमती गोदावरी बने, शिवानंद शंकर पाटील, परविन युन्नूस गारीवर या लाभार्थ्यांना घरकुल मजुरी पत्र जंगम यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम, गटविकास अधिकारी रतिलाल साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते. या वेळी श्री. जंगम यांनी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरे बांधावीत, त्यांना योग्य ती मदत जिल्हा परिषदेकडून मिळेल, असे आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT