Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अकोल्यात ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टर बाधित

 गोपाल हागे

Akola News : यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले असून, एकूण ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपये मदत निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महसूल, कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत व प्रत्येक नुकसानीची काळजीपूर्वक नोंद घेऊन सविस्तर पंचनामे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

वेळोवेळी ठिकठिकाणी पाहणीही केली. त्यानुसार महसूल, कृषी, ग्रामविकास खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे पंचनामे करण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी श्री. कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पाठविण्यात आला आहे. अंतिम अहवालानुसार एकूण ३४९ गावांतील ५७ हजार ३१९ खातेदारांच्या एकूण ५७ हजार ७५८.५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

मदतीसाठी हवेत ७९ कोटी ४४ लाख ३५,९०८ रुपये

नुकसान भरपाईच्या अनुषंगाने एकूण ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ रुपये मदत निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. फळपिके सोडून जिरायती पिकाचे २२७ गावांतील ५६ हजार ९८४.५३ हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यासाठी ७७ कोटी ४९ लाख ८९ हजार ६०८ रुपये मदत निधीची मागणी करण्यात आली आहे.

फळपीक सोडून बागायत क्षेत्राचे २२ गावांतील १५९.६ हेक्टर क्षेत्र बाधित असून ४३ लाख ९ हजार २०० रुपये निधीचा प्रस्ताव आहे. फळपिकांचे ३० गावांतील २२६.५८ हेक्टर क्षेत्र बाधित असून ८१ लाख ५६ हजार ८८० रुपये निधीचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीने ७० गावांतील ३८७.७९ हेक्टर जमीन खरडून गेली असून ६९ लाख ८० हजार २२० रुपये निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Agriculture Mechanization : शेतीच्या कामासाठी सुलभ यांत्रिकिकरण आवश्‍यक

Apple Ber Farming : ॲपल बोर लागवडीत कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Agriculture Processing : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यातीवर भर द्यावा

Satara Agriculture Complex : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल साताऱ्यात, १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT