Wetland  Agrowon
ॲग्रो विशेष

Wetland Survey : नऊ जिल्ह्यांत ५६४ पाणथळ प्रदेश ; प्राधिकरणाची उच्च न्यायालयात माहिती ; पुण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर

Wetland Managenent : राज्यामधील पाणथळ प्रदेशांचा शोध अखेर पूर्ण झाला असून, एकूण ५६४ पाणथळ (वेटलँड) प्रदेश असल्याची माहिती पाणथळ प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर : राज्यामधील पाणथळ प्रदेशांचा शोध अखेर पूर्ण झाला असून, एकूण ५६४ पाणथळ (वेटलँड) प्रदेश असल्याची माहिती पाणथळ प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

नागपूर विभागातील गोंदिया-भंडारा आणि चंद्रपूरमध्ये आढळणाऱ्या सारस पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील विविध बाबींचा विचार करून न्यायालयाने नागपूर, गोंदिया-भंडारा आणि चंद्रपूर येथे आढळणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र ‘सारस संवर्धन समित्या’ स्थापन केल्या आहेत. या समितीने त्यांच्या जिल्ह्याच्या परिसरात सारस पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी ओलसर जमीन ओळखायची असल्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी निश्‍चित करण्यात आली आहे.

पुण्यातील सर्व्हेक्षण अद्यापही सुरू
राज्य पाणथळ प्राधिकरणामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन प्राधिकरणाने चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या संशोधन संस्थेशी करार करण्यात आला. या अंतर्गत राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील अशा जागांचा सर्व्हेक्षणातून शोध घेण्यात आला. यापैकी आठ जिल्ह्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, सर्वाधिक संख्या असलेल्या पुणे जिल्ह्याचे सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. राधिका बजाज यांनी व राज्य शासनातर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.


नागपूर जिल्ह्यात ७१ प्रदेश
नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास ७१ ठिकाणी पाणथळ प्रदेश असल्याचे आढळले आहे. यामध्ये, सर्वाधिक २२ ठिकाण हे हिंगणा येथील, ग्रामीण भागात १७, शहरी व सावनेरमध्ये अनुक्रमे ११ आणि कामठीमध्ये दहा प्रदेशांचा समावेश आहे. नागपूर ग्रामीणमधील कोकडी येथील खासगी प्रदेशाचा देखील समावेश आहे.


फुटाळ्याचाही समावेश
नागपूर शहरी भागात ११ पाणथळ प्रदेश असल्याचे या सर्व्हेक्षणात आढळले आहे. यात सोनेगाव तलाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, नाईक तलाव, लेंडी तलाव, बिनाकी मंगळावरी तलाव, पोलिस लाइन टाकळी तलाव, फुटाळा तलाव, गोरेवाडा तलाव, पांढराबोडी तलाव आणि कोराडी तलावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, फुटाळा म्युझिकल फाउंटनमुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या फुटाळा तलावाचा देखील यामध्ये समावेश आढळून आला आहे.

जिल्हा पाणथळ प्रदेश
नागपूर ७१
गोंदिया ४३
भंडारा ३१
पालघर ८
रायगड १८
ठाणे १९
चंद्रपूर ४६
सिंधुदुर्ग ६३
पुणे (सर्व्हेक्षण सुरू) २६५
एकूण ५६४ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT