Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari: पंढरपूरमध्ये सायकलस्वारांचा रिंगण सोहळा

Pandharpur Ringan: हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीत लाखो विठ्ठल भक्त आळंदी ते पंढरपूर पायी सहभागी होतात. आता या वारीचाच भाग म्हणून आषाढीनिमित्त पांडुरंगाला वंदन करत पर्यावरणाचा जागर करत रविवारी (ता. २२) पंढरपूरमध्ये विविध शहरांतील ९७ क्लबच्या तब्बल पाच हजार सायकलस्वारांचा (सायकलिस्ट) रिंगण सोहळा झाला.

Team Agrowon

Latur News: हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीत लाखो विठ्ठल भक्त आळंदी ते पंढरपूर पायी सहभागी होतात. आता या वारीचाच भाग म्हणून आषाढीनिमित्त पांडुरंगाला वंदन करत पर्यावरणाचा जागर करत रविवारी (ता. २२) पंढरपूरमध्ये विविध शहरांतील ९७ क्लबच्या तब्बल पाच हजार सायकलस्वारांचा (सायकलिस्ट) रिंगण सोहळा झाला.

या वेळी ‘विठू नामाचा गजर आणि पर्यावरण पूरक घोषणांनी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली होती.आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या चरणी राज्याच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक नतमस्तक होतात, संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी येथून निघालेली पालखी मजल दर मजल करत तब्बल महिना भराचा प्रवास करत आषाढी एकदशीला पंढरीत दाखल होते.

हजारो वर्षांची परंपरा असताना या परंपरेचा एक भाग म्हणून राज्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून मागील पाच वर्षांपासून राज्याच्या कानकोपऱ्यातून सायकल वारी काढून पर्यावरण संतुलन अबाधित राहावे यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. या वारीचे यंदाचे यजमानपद लातूरला मिळाले.

लातूर सायकलिस्ट क्लबच्या अथक प्रयत्नांतून यावर्षी भक्तांबरोबरच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो सायकलिस्टनी राज्याच्या विविध शहर ते पंढरपूर वारी काढून पर्यावरण संतुलनाचा संदेश घेऊन रविवारी (ता. २२) भागवत एकादशीदिनी वारीपूर्वीच पंढरपुरात सायकल रिंगण सोहळा साजरा केला.

यामध्ये पाच हजार सायकलिस्टनी सहभाग नोंदविला. यजमानपद असलेल्या लातूर सायकलिस्ट क्लबने विठ्ठल नामाचा गजर करतानाच पर्यावरणाचा जागर करत शुक्रवारी (ता. २०) लातूरच्या दीडशेहून अधिक सायकलस्वारांनी लातूर ते पंढरपूर असा प्रवास करत व रविवारी विशाल सायकल रिंगणात सहभागी झाल्याची माहिती लातूर सायकलिस्ट क्लबचे श्रवण उगले व अभिजीत देशपांडे सरसंबेकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Pik Pahani : सरकारी कामाचा मोबदला कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे ‘ई-पीक’ सहायकांचे मानधन रखडले!

Maharashtra Farmers : बाजार समितीला शेतकऱ्यांचा विसर? मूलभूत सुविधांअभावी बळीराजाची मोठी पिळवणूक!

Shaktipeeth Highway Protest: 'शक्तिपीठ'विरोधात आंदोलन पेटले, मोजणीचे साहित्य फोडले, सांगलीच्या माहुलीत राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचा ८ तास ठिय्या

Bal Vivah Mukt Bharat : बालविवाहाची प्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्धार; 'बाल विवाहमुक्त भारत' मोहीम सुरू

Employment Guarantee : ग्रामीण रोजगाराला मोठी चालना: ‘रोजगार हमी’च्या कामांवर पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक मजूर!

SCROLL FOR NEXT