Dhan Kharedi Agrowon
ॲग्रो विशेष

Dhan Kharedi : संस्थेच्या गैरव्यवहारामुळे ५०० शेतकरी अडचणीत

Paddy Procurement : गोंदिया जिल्ह्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात खरेदी केलेला धान फेडरेशनकडे जमा केला नाही. परिणामी, या केंद्रावर हमीभावाने धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत.

Team Agrowon

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात खरेदी केलेला धान फेडरेशनकडे जमा केला नाही. परिणामी, या केंद्रावर हमीभावाने धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकल्याने त्यांची आर्थिक अडचण होत आहे.

तब्बल ५ कोटी ७६ लाख रुपयांची अफरातफर या संस्था संचालकांनी केल्याचा आरोप आहे. फेडरेशनने संस्थेच्या ११ संचालकांसह चार कर्मचारी अशा एकूण १५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जाते. सहकारी संस्था कमिशन तत्त्वावर शासकीय धान खरेदी करतात. शासकीय धान खरेदी केंद्रावर जमा असलेला हा धान फेडरेशनकडे जमा करावा लागतो, ही प्रक्रिया अनिवार्य आहे.

पण चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेला १२ हजार क्‍विंटल व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्‍विंटल असा २८ हजर क्‍विंटल धान जमाच केला नाही.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेने गोदामाची तपासणी करून या संस्थेला धान जमा करण्यासाठी नोटीस बजावली. पण या संस्थेने धानाची परस्पर विक्री केल्याने फेडरेशनने संस्थेच्या ११ संचालकांसह चार कर्मचारी अशा एूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाचशे शेतकरी अडचणीत

पोलिसांत गुन्हा दाखल केला असला तरी या संस्थेला धान विकणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. या धान खरेदी प्रकरणात ५ कोटी ७६ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संचालक व कर्मचारी फरार झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT