Famer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : बुलडाणा जिल्ह्याला मागील खरीप, रब्बीची सुमारे ५०० कोटींची भरपाई

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेतून सन २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा संरक्षित क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे ५०० कोटींपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश रक्कम खात्यात वळती झाली असून नजर चुकीने अपात्र ठरवलेल्या तक्रारीही मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

या अनुषंगाने मिळालेल्या माहिती नुसार, पंतप्रधान पीकविमा योजनेत गेल्या खरीप व रब्बी हंगामात विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार केलेल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे २६२ कोटी ५७ लाख इतकी नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीने मंजूर केली होती.

तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अपात्र केलेल्या तक्रारी देखील मंजूर करण्याबाबत कृषिमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे विमा कंपनीने याबाबतही सकारात्मक पाऊल उचलले.

अपात्र केलेल्या तक्रारी पात्र करुन २३५ कोटी २ लाख रुपये एवढी वाढीव नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे सन २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामात मंजूर केलेली भरपाई रक्कम ही सुमारे ४९७ कोटी ५६ लाख एवढी झाली आहे.

मंजूर असलेल्या या रकमेपैकी विमा कंपनीने यापूर्वीच खरीप हंगामातील १३८ कोटी ५१ लाख व रब्बी हंगामातील १२ कोटी ९३ लाख नुकसान भरपाई वितरित केली आहे. तसेच शुक्रवारी (ता.२७) रब्बी हंगामातील ११२ कोटी २९ लाख एकूण आतापर्यंत २६३ कोटी ७३ लाख नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा केली असल्याचे म्हटले आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील तरतुदीप्रमाणे पीकविमा कंपनीने एकूण प्रिमियम रकमेच्या ११० टक्के नुकसान भरपाई वितरित केली असून राज्य शासनाकडे २३३कोटी ८३ लाख लाख रुपये निधी मागणी केली आहे. हा निधी प्राप्त होताच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कमही जमा करण्यात येईल असे पीक विमा कंपनीने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT