Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Subsidy : द्राक्षावरील आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान द्यावे

Grape Farmer Demand : राज्य शासनाने संत्र्यांप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशसाठी आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

Team Agrowon

Sangli News : बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या द्राक्षावर प्रतिकिलो १०६ रुपये आयात शुल्क आकारले जाते. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य शासनाने संत्र्यांप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशसाठी आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

बांगलादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने नाशिकसह सांगलीतून होणारी निर्यात घटली आहे. दर कमी झाल्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्काच्या ५० टक्के म्हणजेच सध्याच्या ८८ रुपयांच्या ५० टक्के सवलत दिली आहे. बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यांसाठी प्रतिकिलो म्हणजे ४४ रुपये अनुदान राज्य सरकारमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेशात सध्या द्राक्षांवर १०६.७६ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क आकारले जात आहे. संत्र्यांवरील अनुदानाप्रमाणेच द्राक्षावरील आयात शुल्काच्या ५० टक्के म्हणजेच ५३ रुपये अनुदान तत्काळ मंजूर करावे, तसेच सरकारने निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. जेणेकरून बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यात पुन्हा सुरू होण्यास मदत होऊन उत्पादकांना फायदा होईल, अशी मागणी आहे.

कर्जावरील व्याज सवलत विचाराधीन...

हिवाळी अधिवेशात संत्र्यांच्या पिकास निर्यात शुल्क अनुदान दिले. त्याच धर्तीवर द्राक्ष पिकाच्या निर्यात शुल्कात पन्नास टक्के अनुदान देण्याची मागणी द्राक्ष बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन मार्ग काढला जाईल, असे सांगत द्राक्ष कर्जाच्या व्याजात सवलत देण्याचे विचाराधीन असल्याचे सांगून द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सरकारकडून दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT